हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये भारताला पहिले वहिले पदक जिंकून देणारी वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्या कामगिरीसाठी तिचे सर्व स्तरावरून भरभरून कौतुक करण्यात आले. यानंतर तिची नुकतीच बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानसह भेट झाली. त्यानंतर सलमान खानाने आपल्या ऑफिशियल सोशल मीडियावर मीराबाई चानूसोबतचा फोटो शेअर केला आहे.
https://twitter.com/BeingSalmanKhan/status/1425469741443915780/photo/1
मात्र हा फोटो शेअर केल्यावर नेटकऱ्यांनी सलमानला ट्रोल करण्यास सुरुवात केली. आता तुम्ही म्हणाल यात काय ट्रोल करण्यासारखं आहे. तर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो कि, सलमानने शेअर केलेल्या या फोटोमध्ये एक अशी गोष्ट दिसतेय जिच्यासह सलमानचा खूप मोठा पंगा आहे. यामुळे नेटिझन्स सलमानवर टीकास्त्र चालविताना दिसत आहेत.
हा फोटो शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले कि, सिल्वर मेडलिस्ट मीराबाई चानूला शुभेच्छा, तुझ्यासोबत खूप चांगली भेट झाली, तुला सर्वकाळासाठी खूप खूप शुभेच्छा. या फोटोमध्ये त्याच्यासोबत मीराबाई चानू दिसत आहे. यासह, सलमान खानच्या गळ्यात एक मणिपुरी स्कार्फदेखील दिसत आहे. हा स्कार्फ मीराबाईनेने सलमानला गिफ्ट केला असेल अशी शक्यता आहे. या स्कार्फवर काळ्या हरिणाचे सुंदर चित्र दिसत आहे आणि हेच आहे ट्रोलिंगचे कारण.. आता काळ्या हरणामुळे सलमानला काय आणि किती सहन करावे लागले आहे हे काही नव्याने सांगण्याची गरज नाही.
याबाबत एका युझरने ट्रोल करण्याच्या हेतूने कमेंट केली आहे कि, भाईच्या शॉलवर हरीण… तर दुसऱ्याने लिहिले की, या फोटोमध्ये काय पाहिले? इतकंच काय तर, तिसऱ्याने लिहिले, आता यावर मिम्स बनणार. मात्र या सगळ्यात लक्षवेधक कमेंट ठरली ती अशी कि, हरिण डेव्हिलच्या मागे. डेव्हिल हरणाच्या मागे… टू मच फन. अश्या पद्धतीने सलमान सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे.
भारतीय वेटलिफ्टर मीराबाई चानू हिने टोकियो ऑलिम्पिक २०२० मधील वेटलिफ्टिंग स्पर्धेत भारताला रौप्यपदक जिंकून दिले होते. हे पदक या स्पर्धेतील पहिले पदक आणि देशाचा अभिमान ठरले. त्याबरोबरच तिने वेटलिफ्टिंगमध्ये पदकासाठीचा भारताचा २१ वर्षांचा दुष्काळ संपवला होता. शिवाय २००० च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये कर्नाम मल्लेश्वरी हिने जिंकलेल्या कांस्यपदकानंतर आता टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाईने पदक जिंकून दिले आहे. माहितीनुसार, रौप्यपदक विजेत्या मीराबाई चानूच्या जीवनावर आता एक मणिपुरी चित्रपट अर्थात तिचा बायोपिक चित्रपट बनणार आहे अशी चर्चा आहे.
Discussion about this post