हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। लोकप्रिय रिऍलिटी शो बिग बॉसचा १६ वा अलीकडेच रविवार संपला. या सीजनने प्रेक्षकांमध्ये चांगलाच उत्साह भरला होता. प्रचंड गाजलेल्या सिजनमध्ये या सिजनची भर पडली आहे. रविवारी तब्बल ५ तास बिग बॉस १६ चा भव्य आणि दिमाखदार असा महाअंतिम सोहळा रंगला. प्रियांका चहर चौधरी आणि शिव ठाकरे यांच्यामध्ये लढत दिसता दिसता बिग बॉसच्या ट्रॉफीचा मानकरी एमसी स्टॅन ठरला. यावरून सोशल मीडियावर मोठं ट्रोलिंग झालं. यानंतर आता बिग बॉसचा होस्ट सलमान खान पुढील सीजन होस्ट करणार नाही असे बोलले जात आहे.
बिग बॉस हा शो जेव्हढा सिजनमध्ये सहभागी होणाऱ्या स्पर्धकांमुळे पहिला जातो, त्याहून अधिक सलमान खान विकेंडला येऊन जी काही शाळा घेतो त्यासाठी जास्त पहिला जातो. प्रेक्षकांमध्येही विकेंड का वार पाहण्याची उत्सुकता प्रचंड असते. सलमानचं होस्टिंग म्हणजे वेगवेगळ्या रंगानी भरलेला आणि एनर्जेटिक माहोल तयार झाला म्हणून समजाचं. नुसती धम्माल, मजा, मस्ती करत हसत – खेळत तर कधी घरातल्युर सदस्यांना त्यांच्या चुका दाखवत फटकारत सलमान ज्या पद्धतीने शोची इज्जत राखतो ती फार विशेष बाब आहे. यामुळे बिग बॉस आणि शोचा होस्ट म्हणून सलमान दोघेही चांगलेच लोकप्रिय आहेत. असे असताना आता सलमान हा शो पुढे होस्ट करणार नाही असे बोलले जात आहे. त्यामुळे चाहत्यांनाही मोठा धक्का लागला आहे.
बिग बॉस हिंदी लोकप्रिय ठरण्यामागे सलमान खानचा मोठा वाट आहे यात काही वादच नाही. रुबाबदार आणि जबाबदार सलमानची खास शैली, त्याचा स्वॅग, त्याची मस्ती आणि त्याचा संताप व्यक्त करण्याची पद्धत प्रेक्षकांना प्रचंड आवडते. असे असूनही आता सलमान खान बिग बॉस सोडणार असल्याची चर्चा आहे. बिग बॉसच्या चौथ्या सिजनपासून त्याने होस्टिंगची जबाबदारी पार पाडली आहे. आजवर बिग बॉसचे १२ सिजन होस्ट केल्यानंतर पुढील सिजनमध्ये त्याची भेट नाही हेच मान्य करणे अवघड आहे. मात्र बिग बॉस १६ संपताना सलमानने प्रेक्षकांचा निरोप घेतला नाही. शिवाय भेटूया पुढच्या सिजनमध्ये असेही न म्हटल्याने आता सलमान या जबाबदारीतून मुक्त होणार असे बोलले जात आहे.
Discussion about this post