Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आँखों की गुस्ताखियाँ..’; सलमान खानच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंवर तरुणी झाल्या फिदा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 1, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Salman Khan
0
SHARES
126
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान वयाच्या ५७ व्या वर्षात आहे. तरीही त्याचा अंदाज, त्याची स्टाईल आणि स्माईल किलर आहे. इतकी किलर कि अजूनही तरुणी त्याच्यावर फिदा आहे. आगामी काळात सलमान खानचा ‘किसी का भाई, किसी कि जान’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या निमित्त विविध प्रकारे सलमान आपल्या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसत आहे. उद्या या चित्रपटातील एक भन्नाट गाणे रिलीज होणार आहे. ज्याचा टिझर आज चर्चेत आहे. यातच सगळ्यात जास्त मार्केट खाल्लंय ते सलमान खानच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंनी. हे फोटो सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये आहेत.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

अभिनेता सलमान खान याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर आपले नवे ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट शेअर केले आहे. हे फोटोशूट त्याने ‘किसी का भाई, किसी कि जान’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने केले आहे. पहिला फोटो शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये ‘ब्लॅक अँड व्हाइट’ असे लिहिले आहे. तर दुसऱ्या फोटोसोबत त्याने ‘किसी का भाई किसी की जान’मधील आगामी गाणे ‘बिल्ली बिल्ली’ची माहिती शेअर केली आहे. तसे हे फोटो शेअर करताना सलमानने कोणतेही हटके कॅप्शन दिलेले नाही. कारण त्याचे फोटो इतके कमाल आहेत कि त्याच्यावरून किमान तरुणींची तरी नजर हटणे अवघड आहे. सलमानचे हे फोटो पाहून कोणत्याही तरुण मुलाला आपोआपच हेवा वाटू शकतो.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सलमानच्या फोटोंवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स करत त्याच्या लूकची वाहवाह केली आहे. तर अनेक तरुणींनी सलमानच्या कातिल नजरेची तारिफ केली आहे. इतकंच काय तर, काही तरुणींनी या फोटोवर कमेंट करत थेट लग्नाचा प्रस्तावदेखील ठेवला आहे. एकंदरच काय साठी जवळ आली तरीही सल्लूची हवा आहे. सलमान खानच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, ‘किसी का भाई किसी की जान या सिनेमाशिवाय ‘टायगर ३’ देखील प्रतीक्षेत आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

सध्या बहुचर्चित ‘किसी का भाई किसी की जान’ यावर्षी ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच २१ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदी, तामिळ आणि तेलुगु भाषेत प्रदर्शित होणार आहे. यामध्ये सलमान खानसोबत अभिनेत्री पूजा हेगडे स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. शिवाय या चित्रपटातर शेहनाज गिल देखील एका महत्वाच्या भूमिकेत असणार आहे.

Tags: Instagram PostKisi ka Bhai Kisi Ki JaanSalman KhanUpcoming Bollywood MovieViral PhotosViral Photoshoot
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group