हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बाॅलीवूडचा दबंग खान अशी ओळख असलेला अभिनेता सलमान खान नेहमीच विविध गोष्टींमुळे चर्चेत असतो. कधी वैयक्तीक आयुष्य, अफेअर, मारामारी नाहीतर मग कुटुंबीयांची लाइफस्टाइल. तसा याशिवाय आगामी चित्रपटांसाठीसुद्धा तो चर्चेत असतोच. तुम्ही सोमी अली हे नाव सलमानसोबत जोडल्याचे ऐकलेच असेल. सोमी अली एक अभिनेत्री असून तिने सलमान खानला डेट केलं आहे. ती सलमानची एक्स गर्लफ्रेंड म्हणून ओळखली जाते. त्यामुळे सोनीने सलमानविषयी एखाद वक्तव्य केलं कि साहजिकच त्याची चर्चा होते. आताही तसंच झालं आहे.
अभिनेत्री सोमी अलीने एक्स बॉयफ्रेंड अभिनेता सलमान खानवर निशाणा साधला आहे. दोघांच्याही अफेअरची बराच काळ चर्चा होती. यानंतर काही कारणास्तव त्यांचं ब्रेकअप झालं आणि या चर्चांवर पूर्णविराम लागला. यानंतर आता सोमी अलीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट शेअर करुन सलमान मानसिकदृष्ट्या आजारी आहे म्हणत याच्यावर महिलांना मारहाण करण्याचा गंभीर आरोपसुद्धा लावला आहे. पण काही वेळातच तिने आपली हि पोस्ट डिलिट केल्यामुळे याची पुष्टी करता येणार नाही.
अभिनेत्री सोमी अलीने सलमान खानचा चित्रपट ‘मैंने प्यार किया’चे एक पोस्टर शेअर केले होते. यासोबत सोमीने कॅप्शनमध्ये लिहिले असं काही लिहिलं कि सगळे हक्काबक्का झाले. सोमीने हे पोस्टर शेअर करत म्हटले कि, ‘महिलांना मारहाण करणारा. मीच नव्हे तर अनेकांबरोबर हे घडले. त्याची पूजा बंद करा. तो मानसिकदृष्ट्या आजारी असून सेडिस्टिक आहे. तुम्हा लोकांना याचा अंदाज नाही.’ सोमीची हि पोस्ट सगळ्यांसाठी धक्कादायक होती. पण आता तिने हि पोस्ट डिलीट केल्यामुळे आणखीच प्रश्न निर्माण झाले आहेत.
Discussion about this post