Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

दिग्दर्शक सावन कुमार टाक यांचे निधन; सलमानने शेअर केली भावनिक पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 26, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Salman Khan
0
SHARES
5
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेता सलमान खान याचा ‘सनम बेवफा’ चित्रपट ज्यांनी दिग्दर्शित केला ते दिग्दर्शक सावन कुमार टाक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. सावन टाक यांच्या निधनाचे वृत्त समजताच बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. टाक हे ८६ वर्षांचे होते आणि हृदय विकाराच्या झटक्यामुळे त्यांचे निधन झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांची प्रकृती बिघडल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर बॉलिवूडकर हळहळले आहेत. तर सलमान खानने भावनिक पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Salman Khan (@beingsalmankhan)

मिळालेल्या माहितीनुसार, दिग्दर्शक सावन कुमार टाक यांच्या फुफ्फुसात संसर्ग झाला होता. या समस्येने गेला बराच काळ ते त्रस्त होते. त्यांची तब्येत गेल्या काही दिवसांपासून साथ देत नव्हती. चिंताजनक परिस्थितीत त्यांना कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान त्यांना हृदय विकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्रकृती आणखीच खालावली. यावेळी त्यांच्यावर आयसीयूत उपचार सुरू होते. मात्र ते उपचारांना काही योग्य प्रतिसाद देऊ शकले नाहीत आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे ३ बहिणी आणि १ भाऊ असा परिवार आहे. ते अविवाहित होते. त्यांच्या निधनाच्या बातमीला पीआरओ मन्टू सिंह यांनी दुजोरा दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Absolute India News (@absoluteindianews)

अभिनेता सलमान खान याने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिले आहे कि, ‘माझ्या प्रिय सावन जी तुम्हाला शांती लाभो. तुमच्यासाठी नेहमीच प्रेम आणि आदर आहे.’ सलमान खान आणि सावन कुमार टाक हे अत्यंत जवळचे मित्र होते. यामुळे सलमानसाठी त्यांचे निधन मोठा धक्का ठरला आहे. सावन टाक यांनी अनेक ब्लॉक बस्टर सिनेमांची निर्मिती केली. ‘सनम बेवफा’, ‘सौतन’, ‘साजन बिना सुहागन’सारख्या एकूण १९ दर्जेदार कलाकृती त्यांनी हिंदी सिनेसृष्टीला दिल्या आहेत.

Tags: bollywood directorEmotional PostInstagram PostSalman Khanviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group