हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस हिंदी सीजन १६ चा ग्रँड फिनाले अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेपला आहे. या शोचे होस्टिंग अभिनेता सलमान खान करत असून प्रेक्षक त्याच्या विकेंड का वार’ची आतुरतेने वाट पाहत असतात. या शोमध्ये स्पर्धक भांडतात, बाचाबाची करतात, शिवीगाळ करतात, कधीकधी तर हातसुद्धा उचलतात. मग अशा वेळी यांची फिरलेली डोकी ठिकाणावर आणायचं काम सलमान करतो. त्यामुळे इतर दिवसांपेक्षा विकेंड का वार एकदम हिट आहे. पण ‘बिग बॉस १६’च्या ग्रँड फिनालेचं सूत्रसंचालन सलमान खान करणार नसल्याचे बोलले जात आहे. त्याच्याजागी बिग बॉस ओटीटीचा होस्ट करण जोहर होस्टिंग करताना दिसणार असल्याचीही चर्चा आहे.
बिग बॉसचा १६ वा सीजन एकदम हटके मोडवर सुरु आहे. रोज घरात काही ना काही ड्रामा पहायला मिळतोच. त्यामुळे विकेंड का वारसाठी सलमानकडे बराच खुराक असतो. स्पर्धकांची शाळा घेण्यापासून ते हटके अंदाजात मनोरंजन करण्यापर्यंत सलमान सगळं काही करतो. त्यामुळे नुसतं ‘बिग बॉस’चं नाव काढलं तरी सलमान खान हे नाव आपोआप समोर येतो. बिग बॉसच्या शोचे जेव्हढे चाहते आहेत त्याहून किंचित जास्तच सलमानच्या होस्टिंगची फॅनफॉलोईंग आहे. एकीकडे ‘बिग बॉस १६’चे शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत आणि दुसरीकडे सलमान खान फिनालेच सूत्रसंचालन करणार नाही असं बोललं जात आहे. याच नेमकं कारण काय..? तर अशी चर्चा आहे कि, ‘बिग बॉस १६’च्या फिनालेआधीच सलमान खानचा शोसोबत असलेला करार संपत आहे. त्यामुळे तो फिनाले होस्ट करणार नाही असं बोललं जात आहे.
रिपोर्टनुसार, १२ जानेवारी २०२३ रोजी सलमान खानचा ‘बिग बॉस’ या शो सोबत असलेला करार संपतोय. त्यामुळे हा करार पुन्हा नव्याने करेपर्यंत सलमान खानची जागा अन्य कुणाला तरी घ्यावी लागणार आहे. अर्थात आता हा करार करायचा का नाही हे सर्वस्वी सलमान खानच्या हाती आहे. त्यामुळे मीडिया रिपोर्टनुसार, जर सलमान खान या शोच्या फिनालेचे होस्टिंग करणार नसेल तर त्याची जागा करण जोहर चालवू शकतो. कारण याआधी करण जोहरने ‘बिग बॉस ओटीटी’चा सीझन होस्ट केला होता. शिवाय या सीझनदरम्यान सलमानला डेंग्यू झाला होता तेव्हासुद्धा करण जोहरने शो होस्ट केला होता. त्यामुळे आता ‘बिग बॉस १६’च्या फिनालेचं होस्टिंग सलमान करणार कि त्याची जागा करण जोहर घेणार..? हे तर वेळच सांगेल.
Discussion about this post