Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

समंथाला झालाय ‘हा’ दुर्मिळ आजार; उपचारासाठी लवकरच परदेशी जाणार

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
September 20, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Samantha Ruth Prabhu
0
SHARES
361
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। दाक्षिणात्य सिनेसृष्टी गाजवल्यानंतर बॉलिवूडमध्येही ओटीटीच्या माध्यमातून एंट्री करणारीअभिनेत्री समंथा रुथ प्रभू अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे. यामुळे तिच्या आयुष्यातील अपडेट जाणून घेण्यासाठी तिचे चाहते नेहमीच उत्सुक असतात. नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, समंथा एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असून याच्या उपचारासाठी ती परदेशी रवाना होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तिची प्रकृती म्हणावी तितकी बरी नसल्यामुळे तिने आगामी चित्रपटाचे शूटिंग देखील थांबवले आहे. मात्र अधिकृतरित्या तिच्या आजारपणाबद्दल कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

गेल्या काही दिवसांपासून समंथाने सोशल मीडियापासूनही ब्रेक घेतला आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे तिने शूटिंगमधूनही ब्रेक घेतल्याचे एका वृत्त संस्थेने सांगितले आहे. शिवाय समंथा त्वचेशी संबंधित एका दुर्मिळ आजाराने त्रस्त असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. या आजाराला ‘पॉलीमॉर्फ्स लाइट इरप्शन’ (Polymorphic light eruption) असे म्हणतात. माहितीनुसार, हा आजार सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कामुळे त्वचेवर होतो. हाच आजार समंथाला झाल्यामुळे तिने गेल्या काही काळात कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. अलीकडे पार पडलेल्या अवॉर्ड सोहळ्यासाठी ती रेड कार्पेटवरही झळकली नाही.

View this post on Instagram

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

डॉक्टरांच्या सल्ल्यामुळे ती आपल्या प्रकृतीची काळजी घेत असून कोणत्याही कामांसाठी सक्रिय नाही. सध्या ती ‘खुशी’ या आपल्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती. या चित्रपटात तिच्यासोबत विजय देवरकोंडा दिसणार आहे. मात्र आता तिने याचे शूटिंग थांबवले आहे.

View this post on Instagram

A post shared by Vijay Deverakonda (@thedeverakonda)

आजाराच्या उपचारासाठी ती अमेरिकेला जाणार असल्यामुळे शूटिंगचे वेळापत्रक आता पुढे ढकलण्यात आले आहे. समंथाआधी सलमान खान आणि दिवंगत अभिनेता इरफान खान हे देखील या आजाराचे बळी ठरले आहेत. समंथाच्या आरोग्याविषयी चर्चा सुरु असताना तिच्या मॅनेजरने मात्र हे वृत्त फेटाळलं आहे.

Tags: Instagram PostSamantha PrabhuSouth ActressViral News
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group