Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘तुझा हट्टच तुला आभाळा एवढं मोठं करणार’; समीर चौगुलेंची MHJ’च्या हास्यवीरासाठी खास पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 1, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Samir_Prithvik
0
SHARES
54
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सोनी मराठीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम बघता बघता तुफान लोकप्रिय ठरलाय. आता घराघरात हा कार्यक्रम पहिलाच जातो. या कार्यक्रमात अनेक हास्यवीरांनी प्रेक्षकांच्या पोटात गुदगुल्या करून मनात जागा मिळवली आहे. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राचा कार्यक्रम झाला आहे. या कार्यक्रमातून लोकप्रिय ठरलेला पृथ्वीक प्रताप याचा बुधवारी वाढदिवस आला आणि या निमित्ताने हास्यवीर अभिनेते समीर चौगुले यांनी त्याच्यासाठी कौतुकपर पोस्ट शेअर केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Samir Choughule (@samirchoughule)

या पोस्टमध्ये समीर चौगुले यांनी लिहिले आहे की, ‘मित्रा पृथ्वीक.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा… आमच्या हास्यजत्रेचा ऑलराऊंडर…याच्या अभिनय क्षमतेचा थांगच लागत नाही… त्यालाही आणि आम्हालाही…प्रचंड मेहनती नट… सतत वेगळा प्रयत्न करण्याची याची वृत्ती मला खूप काही शिकवून जाते.. पृथ्वीक अत्यंत कमी वेळात महाराष्ट्राची हास्यजत्राचा आधारस्तंभ झाला आहेस, याचा मला खूप अभिमान आहे…. शीतली आणि शंकऱ्या या प्रहसनातील त्याचा शंकऱ्या मला प्रत्येक सादरीकरणानंतर अचंबित करून जातो… प्रत्येक सादरीकरण हे उत्तमच व्हावं हा तुझा हट्टच तुला आभाळा एवढं मोठं करणार मित्रा… तुला खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप प्रेममित्रा पृथ्वीक.. वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा..’

View this post on Instagram

A post shared by Sony मराठी (@sonymarathi)

अभिनेता समीर चौगुले यांनी हि पोस्ट त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर शेअर केली आहे. यामध्ये त्यांनी पृथ्वीकसोबतचा एक फोटोदेखील शेअर केला आहे. समीर यांनी शेअर केलेल्या या पोस्टवर पृथ्वीकने कमेंट करीत लिहिलंय कि, ‘लव्ह यू समीर दादा’. या पोस्टवर पृथ्वीकच्या अनेक चाहत्यांनीदेखील कमेंट करत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आतापर्यंत पृथ्वीक प्रतापने अनेक मराठी चित्रपटातदेखील काम केले आहे. मात्र त्याला खरी प्रसिद्धी मिळाली ती ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातूनच. या मंचावर त्याने अनेक विनोदी पात्र साकारली आणि अजूनही साकारतोय. त्याची हि हास्यप्रगती अशीच उत्तरोत्तर व्हावी हीच इच्छा!

Tags: Birthday Special PostInstagram PostPrithvik PratapSamir Chouguleviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group