Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘बहरला हा मधुमास’ गाण्यावर माय- लेकीचं Cute रील; सनासोबत आई बेलाने धरला ताल

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
March 3, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Maharashtra Shahir
0
SHARES
74
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। केदार शिंदे यांचा ‘महाराष्ट्र शाहीर’ हा आगामी मराठी चित्रपट सध्या प्रचंड चर्चेत आहे. हा चित्रपट महाराष्ट्राचे लाडके शाहीर साबळे यांच्या जीवनावर आधारित असल्यामुळे हा चित्रपट एक म्युझिकल जर्नी घेऊन येत आहे. या चित्रपटातील एक अतिशय गोड प्रेमगीत ‘बहरला हा मधुमास’ अलीकडेच रिलीज झाले आहे. या गाण्याला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली आहे. या गाण्यात अंकुश आणि सना यांची केमिस्ट्री पहायला मिळते आहे. हे गाणे सध्या ट्रेंड करत आहे. या गाण्यावर सना आणि तिची आई बेला शिंदे यांनी एक रील बनवून शेअर केला आहे. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

A post shared by Everest Entertainment Marathi (@everestentertainment)

अभिनेत्री सना शिंदे हिने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर हा आईसोबतचा रील व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये सना आणि बेला शिंदे दोघीही अतिशय नाजूक पद्धतीने या गाण्याच्या हूकस्टेप फॉलो करताना दिसत आहे. यामध्ये चित्रपटाच्या निर्मात्या आणि सना शिंदेची आई बेला आपल्या लेकीकडे अतिशय कौतुकाने पाहताना दिसत आहेत. यावरून लेकीबाबत असणारा अभिमान स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे आणि अनेक नेटकरी या माय लेकीच्या जोडीवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sana Kedar Shinde (@sanashinde)

महाराष्ट्र शाहीर या चित्रपटातील हे पहिले वहिले प्रेमगीत असून या गाण्यातील अंकुश चौधरी आणि सना शिंदे यांची केमिस्ट्री कमाल आहे. या गाण्याला श्रेया घोषाल आणि अजय गोगावले यांच्या आवाजाची साथ लाभ आहे. तसेच चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अजय अतुल यांनी सांभाळली आहे. त्यामुळे हा चित्रपट बहारदार संगीताची सुरेल मेजवानी घेऊन येत आहे. यामध्ये जय जय महाराष्ट्र माझा, येळकोट येळकोट अशा शाहीर साबळे यांनी रचलेल्या अनेक गाण्यांची नव्या पद्धतीने भेट होणार आहे. हा चित्रपट येत्या २८ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होणार असून या चित्रपटाबाबतची उत्सुकता दिवसागणिक वाढतच चालली आहे.

Tags: Instagram PostKedar shindeMaharashtrache ShahirSana ShindeViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group