हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘जरा चुकीचे.. जरा बरोबर.. बोलू काही.. चला दोस्तहो आयुष्यावर बोलू काही’ असे म्हणत प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकाला आपलेसे करणारे प्रसिद्ध कवी गीतकार संदीप खरे आणि सलील कुलकर्णी यांना कोण ओळखत नाही. या जोडीने ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमाचे आतापर्यंत कित्येक कार्यक्रम गाजवले आहेत. कवी संदीप खरे यांच्या शब्दांची ताकद इतकी असते कि माणूस आपोआपच्या त्यामध्ये गुंततो. याच संदीप खरे यांनी ‘मित्रा’ या शॉर्ट फिल्ममधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. यानंतर आता बऱ्याच काळानंतर पुन्हा एकदा ते त्यांच्या कारकिरकिर्दित पहिली वहिली शॉर्टफिल्म अभिनेता म्हणून करताना दिसणार आहेत.
‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आगामी ‘अथांग’ या वेबसिरीजमध्ये संदीप अतिशय महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. या वेबसीरीजची निर्मिती हरहुन्नरी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने केली आहे. तर दिग्दर्शन जयंत पवार यांनी केलंय. अक्षय बर्दापूरकर प्रस्तुत, तेजस्विनी पंडित, संतोष खेर निर्मित ‘अथांग’मध्ये संदीप खरे, निवेदिता जोशी सराफ, भाग्यश्री मिलिंद, उर्मिला कोठारे, ऋतुजा बागवे, दीपक कदम, ओमप्रकाश शिंदे, केतकी नारायण, शशांक शेंडे, योगिनी चोक, रसिका वखारकर आणि धैर्य घोलप या कलाकारांची फौज झळकणार आहे. यातील कवी आणि गीतकार संदीप खरे यांच्यासाठी हि वेबसिरीज फार जवळची आहे. या निमित्त त्यांनी एक पोस्टदेखील शेअर केली होती.
संदीप खरे यांनी शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले होते कि, ‘अभिनेता म्हणून माझी ही पहिलीच वेब सिरीज ! एका हादरवून टाकणाऱ्या कथेमध्ये, अत्यंत वेगळी छटा आणि नियती असलेली ही भूमिका ! आज दसऱ्याच्या निमित्ताने हा टीजर प्रदर्शित झाला… प्लॅनेट मराठी या ओ टी टी ॲप वरती लवकरच ही संपूर्ण वेब सिरीज प्रदर्शित होईल!! शुभेच्छा आणि आशीर्वाद असेच राहू देत !! प्लॅनेट मराठी, निर्माते, दिग्दर्शक, सहकलाकार, तंत्रज्ञ आणि सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार !!
युगायुगांच्या वारुळातुनी, क्षणाक्षणांची रांग…
मनामनांचे डोह काजळी, दरियाहून ‘अथांग’ !!
“अथांग” लवकरच फक्त ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर !
Discussion about this post