Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

बहुचर्चित ‘KD- द डेव्हील’ साऊथ अॅक्शन सिनेमात संजू बाबा साकारणार महत्वपूर्ण भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 22, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
KD- The Devil
0
SHARES
4.2k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। प्रेक्षकांमध्ये विविध श्रेणीतील कथानक आवडणाऱ्या प्रेक्षकांचा समावेश असतो. कुणाला प्रेमकथा आवडतात. तर कुणाला गूढकथा, कुणाला भयकथा आवडतात तर कुणाला अॅक्शनपट. म्हणूनच येत्या काळात KVN प्रोडक्शन कालीला तुमच्या भेटीसाठी घेऊन येत आहे. काली.. म्हणजे अॅक्शनचा फुल डोस. नुकताच KD- द डेव्हील या आगामी चित्रपटाचा टिझर रिलीज झाला आहे. जो सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. मुख्य म्हणजे हा एक दाक्षिणात्य चित्रपट असून या चित्रपटात संजु बाबाने एक मुख्य भूमिका निभावली आहे.

केडी – द डेव्हिल या आगामी चित्रपटाची घोषणा प्रसिद्ध कलाकार ध्रुव सर्जाने केली असून याचा हिंदी टीझर आणि शीर्षक गुरुवारी रिलीज झाले. दरम्यान बॉलिवूड अभिनेता संजय दत्तने ध्रुव सर्जाच्या आगामी चित्रपटाचा हा टीझर लाँच केला आहे. संजय दत्त २० ऑक्टोबर २०२२ रोजी, गुरुवारी केडी – द डेव्हिलच्या टीझर लॉन्च कार्यक्रमात सहभागी झाला होता. यावेळी संजू बाबाने ध्रुव सरजाच्या केडी – द डेव्हिलचा हिंदी टीझर प्रदर्शित केला. या चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनसाठी अभिनेता संजय दत्त याने आपला आवाज देत एक अत्यंत महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. या प्रसंगी संजय दत्तने साऊथ सिनेइंडस्ट्री आणि KGF २ बाबत काही वक्तव्य केली आहेत.

View this post on Instagram

A post shared by Sanjay Dutt (@duttsanjay)

या कार्यक्रमादरम्यान साऊथ इंडस्ट्रीबद्दल बोलताना संजय दत्त म्हणाला की, ‘साऊथ सिनेमांमध्ये पॅशन, हिरोइझम आणि अॅडव्हेंचर असं सगळंच सिनेमांमध्ये पहायला मिळतं. जे लोकांना खूप आवडतं. पण त्याचे मूळ विसरता कामा नये, जिथून सिनेमा सुरू होतो. मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मी KGF २ मध्ये काम केले आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक प्रशांत नील, यश आणि विनम्र फिल्म्ससोबत काम करणे हा माझ्यासाठी एक अद्भुत अनुभव होता. आता मला ध्रुवसोबत हा कारवाँ असाच पुढे न्यायचा आहे. मला संधी मिळाली तर आगामी काळात मी आणखी अनेक साऊथ चित्रपट करू शकेन. ध्रुव सर्जा स्टारर केडी – द डेव्हिलमध्ये संजय दत्त महत्त्वाची भूमिका साकारत आहे.

‘शंभरीच्या शांताबाई’ रसिक श्रोत्यांसाठी ‘अमिथी’ची सुरेल मैफिल

केडी द डेव्हिल हा एक अॅक्शन ड्रामा चित्रपट आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रेम यांनी केले आहे. या चित्रपटाची निर्मिती KVN प्रॉडक्शनने केली आहे. तर संगीत अर्जुन जान्याचे आहे. ‘केडी द डेव्हिल’ हा चित्रपट कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगु आणि मल्याळम अशा ५ भाषेत रिलीज होणार आहे.

Tags: Instagram PostNew Upcoming Moviesanjay duttViral VideoYoutube Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group