हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आज संपूर्ण राज्यभरात गोकुळाष्टमीचा सण मोठ्या भक्ती भावाने आणि उत्साहाने साजरा करत आहेत. यांनतर उद्याचा दिवस एकदम जोशीला असणार आहे. कारण अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी दहीहंडीचा सण साजरा केला जातो. गेल्या २ वर्षात कोरोनामुळे हा सण साजरा करता आला नाही. पण आता मात्र यंदाचा गोपाळकाला जोरदार होणार यात काहीच वाद नाही. या सणाला गालबोट लागू नये म्हणून यंत्रणा सक्रिय झाली आहेच. सोबत मराठी अभिनेता संतोष जुवेकरने एक खास पोस्ट करत गोपाळांना काळजी घ्या रे असे सांगितले आहे.
अभिनेता संतोष जुवेकरने एक व्हिडीओ पोस्ट करीत सोशल मीडिया इंस्टाग्राम हँडलवर शेअर केली आहे. हा व्हिडिओ शेअर करताना संतोषने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘२ दिवसांवर ‘गोपाळ अष्टमी’ आलीये. गेली दोन वर्ष हा गोपाळ काला उत्सव साजरा करता नाही आला कारण कोव्हीडच संकट तीव्र प्रमाणात होत पण ह्या वर्षी ह्या उत्सवाचा जोर आणि जोश काही औरच असणार आहे. सगळेच गोपाळ आणि गोपिका दही हंडी फोडण्याची जोरात तयारी करतायत कस्सून सराव चालाय.’
पुढे लिहिले कि, ‘कालच माझे खूप जवळचे मित्र श्री. मनोज चव्हाण दादांमुळे महाराष्ट्रात गाजलेल्या ‘जय जवान गोविंदा पथक, जोगेश्वरी (मुंबई)’ यांची प्रॅक्टिस बघण्याची संधी मिळाली. क्या बात मित्रांनो आणि मैत्रिणींनो जोमात आहात सगळे तुम्ही. एक क्षण वाटलं आपण पण घुसावं पण इतकं सोप्प नाही ते लगेच जाणवलं. माझ्या तुम्हाला आणि सगळ्या गोविंदा पथकांना खूप खूप शुभेच्छा! आणि एक विनंती… मित्रांनो कृपया करून स्वतःची आणि तुमच्या सोबत येणाऱ्या मुलींची आणि लहान मुलांची काळजी घ्या. दहीहंडी हा सण आहे आपला… तो सणासारखाच साजरा करा. त्याची स्पर्धा करू नका. जोश असुदे पण सोबतीला होशही असूदेत. बाकी आपले #maharashtrapolice आहेतच आपल्या मदतीला आणि आवलीगीरी करणाऱ्यांना फटके द्यायला. मज्जा करा आणि काळजी घ्या रे! संतोषच्या या पोस्टवर अनेकांनी प्रतिक्रिया देत त्याचे आभार मानले आहेत आणि त्यालाही सणाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Discussion about this post