Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

प्रेक्षकांना मराठी सिनेमाचं ‘वेड’ लागू दे रे महाराजा; संतोष जुवेकरचा वेडेपणा नेटकऱ्यांना भावला

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 28, 2022
in Trending, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Santosh Juvekar
0
SHARES
110
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सध्या सोशल मीडियावर अत्र तत्र सर्वत्र अभिनेता रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित आगामी मराठी चित्रपट ‘वेड’बद्दल चर्चा आहे. सोशल मीडियावर या चित्रपटातील गाण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यातल्या त्यात ‘वेड लावलंय’ या गाण्याने तर नावाप्रमाणेच सगळ्यांना वेड लावलं आहे. अगदी मराठी ते बॉलिवूड इंडस्ट्रीपर्यंत सगळ्यांनाच या गाण्याने भरलं पडली आहे. या चित्रपटाविषयी एक खास पोस्ट शेअर करत अभिनेता संतोष जुवेकरने देखील चित्रपटाला शुभेच्छा दिल्या आहेत आणि प्रेक्षकांना आवाहन केले आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

अभिनेता संतोष जुवेकरने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने रितेश देशमुख आणि जिनिलिया देशमुख यांच्या ‘वेड’ चित्रपटातील ‘वेड लावलंय’ या गाण्याच्या हुक स्टेप केल्या आहेत. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओसोबत संतोषने या पोस्टमधून मायबाप रसिक प्रेक्षकांनी मराठी चित्रपट चित्रपटगृहांत जाऊन पाहावा यासाठी आवाहन केले आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे कि, ‘भावा all the very best.. तुझं वेड… आणखीन वेड लावणार महाराष्ट्राला. माझ्या मायबाप प्रेक्षकांना माझ्या मराठी सिनेमाचं वेड लागूदे रे महाराजा गणपती बाप्पा मोरया. ३० डिसेंबरला वेड लागणार सगळ्या चित्रपटगृहात’.

View this post on Instagram

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

गेल्या महिन्यातच अभिनेता संतोष जुवेकरचा ‘३६ गुण’ हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. मात्र या चित्रपटाला आवश्यक तितक्या स्क्रीन्ससुद्धा मिळाल्या नाहीत आणि प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद देखील मिळाला नाही. संतोषने अनेकदा मराठी चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद आणि अपुऱ्या स्क्रिनबाबत तक्रार केली आहे. त्यामुळे आता रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटासाठी त्याने हि खास पोस्ट शेअर करत प्रेक्षकांना मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन पाहण्याची विनंती केली आहे. या शुक्रवारी दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजी हा चित्रपट सर्वत्र सिनेमागृहात प्रदर्शित होतो आहे.

Tags: Instagram Postmarathi actorSantosh JuvekarVedviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group