Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हा फोटो खरा असेल तर..’; हॉलिवूड स्टार टॉम क्रूझला टॅग करत मराठी अभिनेत्याची भन्नाट पोस्ट

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
June 12, 2023
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, सेलेब्रिटी
Santosh Juvekar
0
SHARES
84
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संतोष जुवेकर हा सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. त्यामुळे अनेकदा विविध पोस्ट शेअर करत तो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसतो. सोशल मीडियावर त्याचे फॉलोवर्सही बरेच आहेत आणि यामुळे त्याच्या पोस्ट नेहमीच चर्चेत असतात. आताही त्याने एक भन्नाट मजेशीर अशी पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्याने एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत हॉलिवूड सिनेविश्वातील लोकप्रिय अभिनेता टॉम क्रूजसारखे दिसणारे तिघे जण दिसत आहेत. हा फोटो अभिनेता टॉम क्रूझला टॅग करत त्याने भन्नाट कॅप्शन लिहिलं आहे.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

या फोटोसोबत संतोष जुवेकरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘जर हा फोटो खरा असेल तर असा सेम कुणी माझ्यासारखाच दिसणारा असेल तर मला फोटो पाठवा. एकाच वेळेला खूप कामं आली तर वाटून घेता येतील. खरंच पाठवा आणि मला टॅग करा. एकमेका सहाय्य करू अवघे मिळवू यश. ए टॉम्या तुलापण टॅग केलंय. तू पण पाठवू शकतोस बरं का तुझा फोटो. तुझ्या आधार कार्डवरील फोटो सारखाच दिसतो मी. काळजी करू नको, आपण सारखेच आहोत’. संतोषच्या या पोस्टवर नेटकरीसुद्धा मजेशीर कमेंट्स करताना दिसत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Tom Cruise (@tomcruise)

अभिनेता संतोष जुवेकरने शेअर केलेला हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या फोटोतील तिघे जण खरोखरंच एकसारखे दिसत आहेत. महत्वाचं म्हणजे तिघेही टॉमसारखे हुबेहूब. त्यामुळे हा फोटो सोशल मीडियावर वेगवेगळ्या कॅप्शनने ट्रेंड होतोय. काही नेटकऱ्यांच्या मते हा फोटो आर्टिफिशिअल इंटेलिजेन्सने तयार केला आहे. तर काही म्हणत आहेत या फोटोतला एक खरा टॉम आहे आणि बाजूचे दोघे त्याचे बॉडी डबल आहेत. हा फोटो खरा कि खोटा हि वेगळी गोष्ट आहे. पण या फोटोने सोशल मीडियावर धमाल आणली आहे एव्हढं नक्की.

Tags: Hollywood ActorInstagram Postmarathi actorSantosh JuvekarTom CruiseViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group