Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘आधी तिरस्कार मग सत्कार’; संतोष जुवेकरने सांगितला शाहरुख खानच्या प्रोडक्शनसोबतचा किस्सा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 6, 2022
in फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी, हिंदी चित्रपट
Santosh Juvekar
0
SHARES
21
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेता संतोष जुवेकर हा एक असा कलाकार आहे ज्याने स्वतःच्या स्वबळावर इंडस्ट्रीमध्ये नाव कमावलं आहे. कुणीतरी आणलं आणि मोठं केलं अशी त्याची ख्याती नाही. संतोषने विविध नाटक, मालिका, जाहिराती अशा लहान सहन प्रोजेक्टमध्येही अव्वल दर्जाचे काम केले. ज्यामुळे प्रेक्षकांच्या मनात संतोषची जागा कायमची सेट झाली. स्ट्रगल कुणालाच चुकलेलं नाही पण स्ट्रगलला हरून थांबणारा संतोष कधीच नव्हता. संतोषने एक असा किस्सा आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. ज्यामध्ये आधी तिरस्कार आणि मग सत्कार याची प्रचिती येते.

संतोषने लिहिलंय कि, ‘वर्ष – १९९८. ठिकाण – दीप भवन, Dreams unlimited production (शाहरुख खान आणि जुही चावला प्रोडक्शन ऑफिस) मी ऑफिसच्या बाहेर उभा राहून आत जाता येईल का कुणाला भेटता येईल का म्हणुन गेटवर जाऊन विचारतो एका सिक्युरिटी गार्डला तर, तो मला ओरडून ”चलो निकलो इधरसे चलो उधर खडे रहो, किसीने बुलाया होगा तोही अनेका. चलो निकलो आणि मी थोडासा नाराज होऊन पण थोडासा चिडून त्याला बोलतो ”रुक तू.. एक दिन तुमलोगही गेट खोलेगा मेरे लिये” असं बोलून त्या बिल्डिंगजवळ थोड्यावेळ उभं राहून मी निघून जातो. पण मनात आणि डोक्यात एक स्वप्नं आणि तो अपमान कायम उराशी बाळगलेला.

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

मग काही वर्षांनतर मला एक कॉल येतो “हाय संतोष सर, मी रेडचीली एंटरटेनमेंटमधून मधून बोलतोय.. आपण भेटू शकतो का.? आम्हाला तुम्हाला पुढील चित्रपटासाठी कास्ट करायचं आहे. शक्य झाल्यास आपण आमच्या ऑफिसमध्ये या.” वर्ष – २०२० ठिकाण – खार सांताक्रूझ. Red chillis entertainment pvt ltd (शाहरुख खान प्रोडक्शन ऑफिस) मी गेटवर पोहोचतो माझ्या गाडीतून. गाडी गेटच्या बाहेर पार्किंगसाठी जागा शोधतोय तेव्हढ्यात कॉल येतो ” हाय सर.. तुम्ही कुठे आहेत..? आम्ही तुमची वाट पाहतोय.” मी त्यांना सांगतो की, मी आलोय खाली आहे. पार्किंगसाठी जागा शोधतोय. तर तो मला म्हणतो, अहो सर प्लिज आतमध्ये पार्क करा. मी कुणालातरी तुम्हाला असिस्ट करायला पाठवतो. आणि काही मिनटात ऑफिसच गेट उघडल जात. सिक्युरिटी धावत माझ्या गाडीजवळ येतो आणि मला सांगतो ”सर प्लिज आईये.” बास्स्स्सस्स्स्सस्स्स्सस्स्स्स..

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

ते शब्द कानावर पडतात आणि मला १९९८ चा संतोष दिसतो बाजूलाच उभा असतो तो कडक थाप माँरतो पाठीवर तो माझ्या आणि म्हणतो “भाई य्ये मेरा शेर….. ज्जा जिले अपनी जिंदगी.” शाहरुख काकांच्या सिनेमांतलं त्यांच्या तोंडी असलेलं वाक्य. “कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पूरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.” आणि आपल्या मराठीत म्हण आहेच की देवाची करणी आणि नारळात पाणी. बस बाप्पा कडे एवढीच मागणी तू खूप देतोयस पण ते सांभाळण्याची बुद्धी आणि शक्ती सुद्धा दे महाराजा. बाकी मला अजून मोठ्ठ करायला तुम्ही सगळे आहातच. आवडलं तर शाब्बास म्हाना आणि नाही आवडलं तर कान पिळा पन हानू नका.’

View this post on Instagram

A post shared by Santosh Juvekar (@santoshjuvekar12)

असा हा संतोषच्या आयुष्यातील कधीही विसरता येणार नाही असा एक भारी किस्सा आहे. यातून हार मानू नका असे सांगणारा संतोष आज यशाच्या भव्य शिखरावर राज्य करतो. पण तरीही त्याचे पाय मात्र जमिनीवर आहेत हे काय ते महत्वाचं. वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं झालं तर, सध्या तो आलिया भट्टचा बहुचर्चित ‘डार्लिंग्ज’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटामध्ये त्याने महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे. याचनिमित्त त्याने हि पोस्ट शेअर केली होती. ‘डार्लिंग्ज’मध्ये संतोष एका पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारतत आहे. आलियासह शाहरुखच्या रेड चिलीज कंपनीने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हा चित्रपट ५ ऑगस्ट २०२२ रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे.

Tags: DarlingsInstagram PostSantosh JuvekarSRK Productionviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group