हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती होण्याचा बहुमान मिळविणारे हंबीरराव मोहिते यांचे शौर्य अख्ख्या महाराष्ट्राच्या मातीला ठाऊक आहे. त्यांचा हाच जीवनप्रवास आजच्या पिढीसमोर उलघडण्यासाठी लेखक आणि दिग्दर्शक प्रविण तरडे रुपेरी पडद्यावर इतिहास घेऊन येत आहेत. प्रविण विठ्ठल तरडे यांचा ‘सरसेनापती हंबीरराव’ हा ऐतिहासिक चित्रपटा घोषित झाल्यापासून चर्चेत आहे आणि आता लवकरच तो प्रदर्शित होणार आहे. या संदर्भातील माहिती नुकतीच सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रवीण तरडे यांनी दिली आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ चित्रपटाच्या पोस्टर आणि टीझरने आधीच प्रेक्षकांची उत्सुकता वाढवली आहे. यानंतर आता फार दिवस प्रतीक्षा करण्याची गरज नाही. कारण आता या बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. ‘आता आपण फक्त दिवस मोजायचे’ असं म्हणत प्रवीण तरडे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. येत्या २७ मे २०२२ रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
‘सरसेनापती हंबीरराव’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठ्यांच्या इतिहासातील एक सोनेरी पान अगदी अलगदपणे रुपेरी पडद्यावर उलगडणार आहे. परिस्थिती जेव्हढी बिकट मराठा तेव्हढाच तिखट अशा टॅगलाईनसोबत एक नवं पोस्टर आणि प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा आणि संवाद प्रवीण तरडे यांनीच लिहिले आहेत. तर दिग्दर्शनाचीही जबाबदारी त्यांनीच पेलली आहे. या चित्रपटात अभिनेता गश्मीर महाजनी हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसतोय. तर हंबीरराव मोहिते यांच्या भूमिकेत प्रवीण तरडे दिसत आहेत.
Discussion about this post