हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या ३ महिन्यात बिग बॉस मराठीचा चौथा सीजन तुफान गाजला. या सिजनमध्ये अगदी पहिल्या दिवसापासून किरण माने तटस्थ भूमिकेत राहिले. आलेली प्रत्येक खेळी त्यांनी परतवून लावली. अजिंक्यतारा होऊन प्रत्येक टास्क त्यांनी बुद्धीच्या बळावर खेळला आणि प्रेक्षकांच्या मनात आपली हक्काची जागा निर्माण केली. त्यामुळे आता जेव्हा फिनालेत किरण मानेंची एंट्री झाली आहे तर सातारकर देखील पूर्ण जोशाने समर्थन करताना दिसत आहेत. संपूर्ण सातारा किरण मानेंनी बिग बॉसचे चौथे पर्व जिंकावे म्हणून त्यांना पाठबळ देत आहे.
‘दाद्या.. ट्रॉफी घेऊन ये’, ‘सातारचा बच्चनच जिंकणार.. ‘, ‘सातारचा अजिंक्यतारा विजयी हो’ असे म्हणत त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडिया अगदी दणाणून टाकला आहे. विषय बिग बॉसचा असेल आणि साताऱ्याचा उल्लेख नसेल असे होणे नवलच. आज किरण माने बिग बॉस मराठीचे चौथे पर्व गाजवताना दिसत आहेत.
तसेच याआधी सातारच्या अभिजित बिचुकले यांनीही आपला सीजन गाजवला होता. एकंदरच सातारच्या पोरांचा नाद करायचा नाय. हे स्पर्धक बिग बॉसच्या इतिहासात साताऱ्याचे नाव कोरण्यात यशस्वी झाले आहेत. मानेंसारख्या ग्रामीण भागातील एका सातारकराने फिनालेत जागा मिळवली हि बाब सातारकरांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
सध्या विविध माध्यमावर सातारचा बच्चन अर्थात किरण माने यांचीच हवा पहायला मिळते आहे. आपल्या मनातल्या भावनांना वाट करून देत अभिनयाच्या जोरावर कष्टाने ज्यांनी मनोरंजन विश्वात नाव कामवाल्या त्याच किरण मानेंनी बिगबॉसची वाट धरून यशाचे एक नवे शिखर गाठले आहे.
सातारचे नावलौकिक वाढवणारा कष्टाळू अभिनेता अशी ख्याती असलेले किरण माने विजयी व्हावेत याकरिता केवळ सातारकर नव्हे, तर राज्यभरातून ठिकठिकाणाहून वोटिंग अपील झाली.
मनोरंजन विश्वातील अनेक दिग्गज कलाकारांनी आणि अगदी प्रतिष्ठित नेतेमंडळींनीदेखील किरण माने यांना समर्थन दिले. त्यामुळे किरण मानेंची हवा पाहता ट्रॉफी अब दूर नाही…. उद्या संध्याकाळी बिग बॉस मराठी ४ चा महाअंतिम सोहळा मोठ्या दिमाखात पार पडेल आणि आपल्याला या पर्वाचा विजेता कोण होणार हे समजेल.
Discussion about this post