हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून झी मराठी वाहिनीवर नवनवीन मालिकांनी जबरदस्त एंट्री केली आहे. यांपैकी अनेक मालिकांनी अगदी अल्पावधीतच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. अलीकडेच १२ सप्टेंबर २०२२ रोजी झी मराठी वाहिनीवर ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हि अनोखी कथानक असलेली मालिका सुरु झाली आहे. या थ्रिलर मालिकेला सुरु होऊन पूर्ण आठवडा देखील झाला नाही तोच या मालिकेने TRP च्या शर्यतीत उडी घेतली आहे. पहिल्याच आठवड्यात ७२ टक्के लोकांनी या मालिकेला विशेष पसंती दिली आहे.
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेचे कथानक थ्रिलर आहे. यामुळे प्रेक्षकांनी मालिकेला विशेष पसंती दर्शवली आहे. या मालिकेत अभिनेत्री तितीक्षा तावडे हि मुख्य भूमिकेत दिसते आहे. नेटकऱ्यांनी या मालिकेच्या प्रोमोवर प्रतिक्रिया देत मालिका आवडत असल्याचे म्हटले आहे. मालिकेतील मुख्य पात्र नेत्राच्या आयुष्यात घडणाऱ्या गुढमय गोष्टी आणि आता पुढे काय होणार..? याची उत्सुकता प्रेक्षकांना मालिकेकडे ओढते आहे. त्यामुळे सध्या टीआरपीच्या शर्यतीत ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेसोबत लवकरच टॉप १० मध्ये ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ हि मालिका देखील दिसू शकते.
तूर्तास तरी हि मालिका प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी झाली आहे. पण हि मालिका टीआरपी रेसमध्ये किती टिकेल हे येत्या काही भागांमध्ये कळेल. मालिकेच्या कथानकाबद्दल बोलायचे झाले तर, नेत्रा नावाच्या खेड्यात राहणाऱ्या एका मुलीची हि गोष्ट आहे. ती भविष्याचा अंदाज घेऊ शकते अशी अनोखी शक्ती तिच्याकडे आहे. त्रिनयना देवीने तिला भविष्य पाहण्याची शक्ती दिली आहे. मात्र गावकरी तिला ‘अपशकुनी’ म्हणून संबोधत आहेत. नेत्राला तिची दैवी शक्ती समाज आणि तिच्या गावकऱ्यांच्या कल्याणासाठी वापरायची आहे. पण नेत्राचे आयुष्य वाटते तितके सोपे नाही. यासाठी तिला अनेक अडचणींना सामोरे जायचे आहे. वर्तमान जगताना भविष्याचा वेध घेणारी नेत्रा कशी करेल या सगळ्याचा सामना..? हे पाहण्यासाठी मालिका जरूर पहा. ही मालिका बंगाली आणि तेलगू टीव्ही मालिका त्रिनयनीचा रिमेक असल्याचे सांगण्यात येत आहे.
Discussion about this post