हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉस १४ चा स्पर्धक आणि प्रसिद्ध गायक राहुल वैद्य आणि मालिका अभिनेत्री दिशा परमार यांचे मोठ्या दिमाखात लग्न पार पडले. या लग्नासोहळ्याचे अनेको व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले. इतकेच काय तर लग्नानंतरच्या प्रत्येक विधींचे व्हिडीओ सुद्धा चर्चेचा विषय ठरले. यानंतर आता राहुलच्या घरी सत्यनारायणाची पूजा झाली आणि मुख्य म्हणजे नवदांपत्याने पारंपरिक मराठमोळा पोशाख परिधान केला होता. ते दोघेही या पोशाखामध्ये अत्यंत सुंदर दिसत होते
राहुल आणि दिशाच्या लग्नासोबतच त्यांच्या रिसेप्शनचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्याची चर्चा अजूनही सुरू आहे. लग्नानंतर दिशाने वैद्य कुटुंबाच्या आयुष्यात आणि घरात गृहप्रवेश करतानाचा एक व्हिडीओ राहुलने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. त्यावर दोघांच्याही चाहत्यांनी अनेको भरभरून कमेंट्स केल्या आहेत. अजूनही अनेक चाहते त्यांना शुभेच्छा देताना दमात नाहीयेत. त्यात आता सत्यनारायणाची पूजा, पारंपरिक पद्धती आणि त्यांचा पोशाख या सगळ्यानेच चाहत्यांचे लक्ष आणखीच वेधून घेतले आहे.
सर्वसाधारणपणे लग्नानंतर महाराष्ट्रीयन कुटुंबामध्ये सत्यनारायणाची पूजा करणे शुभ मानले जाते. त्यामुळे हि परंपरा वर्षानुवर्षे सुरु आहे. राहुल मराठमोळा असल्यामुळे त्यांच्याही घरी हि विधी संपन्न झाली. या पूजेवेळी दिशा आणि राहुलने मराठमोळा पेहराव केला होता. दिशाने गुलाबी केशरी अशा रंगसंगतीची साडी नेसली होती आणि केसांचा आंबाडा घालून त्यावर गजरा माळला होता. शिवाय गळ्यात मंगळसूत्र, काही सोन्याचे दागिने, हातामध्ये चुडा आणि नाकात टपोऱ्या मोत्यांची नथ घातलेली दिशा अगदी मराठमोळ्या सुनबाईसारखी दिसत होती. तर राहुलने धोती-कुर्ता घातला होता. हे दोघेजण खूप सुंदर दिसत होते. त्यांचे हे फोटो सोशल मीडियावर येताच चाहत्यांनी कौतुक, प्रेम आणि आशीर्वादाचा पाऊस पाडला आहे.
Discussion about this post