Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

‘हर हर महादेव’मध्ये सायली संजीव साकारतेय ‘महाराणी सईबाई भोसले’ यांची आव्हानात्मक भूमिका

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
October 10, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, मराठी चित्रपट, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Sayali Sanjeev
0
SHARES
191
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सुलतानी अंधार पसरलेला असताना माता जिजाऊंनी स्वातंत्र्यतेचे पाहिलेले स्वप्न, बारा हजार शत्रूंवर विजय मिळवणारे आपले तीनशे मावळे आणि बाजीप्रभूंच्या झणाणत्या रणझुंजार कर्तृत्वाचे भाष्य करणारा ‘हर हर महादेव’ हा चित्रपट आपल्या भेटीस येण्यास सज्ज आहे. येत्या दिवाळीत हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटाबाबत वेगळीच उत्सुकता आहे. या चित्रपटाला अत्यंत तगडी स्टारकास्ट लाभली आहे. झी स्टुडियोजची निर्मिती असलेल्या आणि अभिजित देशपांडे यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटातील महाराणी सईबाईंच्या भूमिकेवरून आता पडदा उठला आहे. या भूमिकेत मराठी अभिनेत्री सायली संजीव आपल्याला दिसणार आहे. तसे पोस्टर देखील प्रदर्शित झाले आहे.

View this post on Instagram

A post shared by Zee Studios (@zeestudiosofficial)

अभिनेत्री सायली संजीवने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवर हे पोस्टर शेअर केली आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘मनातील दु:ख चेहऱ्यावर न दाखवता नेहमी स्मित हास्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पाठिशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यांच्या अर्धांगिनी ‘महाराणी सईबाई भोसले’. त्यांच्या भूमिकेत अभिनेत्री सायली संजीव. लढण्यासाठी लाखो हत्तींचं बळ देणाऱ्या शिवमंत्राचा आवाज संपूर्ण हिंदुस्थानात घुमणार… येत्या दिवाळीत, २५ ऑक्टोबरपासून ‘हर हर महादेव’ मराठी, हिंदी, तमिळ, तेलुगू आणि कन्नड या ५ भाषांमधून आपल्या भेटीला येणार.’

View this post on Instagram

A post shared by सुबोध भावे(Subodh Bhave) (@subodhbhave)

भारताचा इतिहास प्रत्येकाला कळावा, म्हणून एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच विविध भाषांतून ‘हर हर महादेव’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. अभिजीत देशपांडे यांचे लेखन आणि दिग्दर्शन असलेल्या ‘हर हर महादेव’ या चित्रपटाची निर्मिती सुनील फडतरे यांच्या श्री गणेश मार्केटिंग अँड फिल्म्स’ने केली आहे. येत्या दिवाळीत २५ ऑक्टोबरला ‘हर हर महादेव’ सर्वत्र प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात शिवरायांच्या भूमिकेत अभिनेता सुबोध भावे तर बाजीप्रभूंच्या भूमिकेत शरद केळकर आणि त्यांच्या पत्नी सोनाबाईंच्या भूमिकेत अभिनेत्री अमृता खानविलकर दिसणार आहे. या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये एक वेगळीच उत्सुकता आहे.

Tags: Har Har MahadevInstagram PostSayali Sanjeevsubodh bhaveUpcoming Marathi Movieviral post
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group