हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। सर्व स्त्रियांना हवीहवीशी वाटणारी साडी म्हणजे पैठणी… कारण या पैठणीचे रंग आणि तिच्या पदरावरचे मोर व आकर्षक काठ हे सार काही स्त्रियांना लक्ष देण्यास भाग पाडतात. हीच पैठणी आज प्रेक्षकांपुढे मोठ्या रुबाबात आहे. कारण यंदाच्या मानाच्या समजल्या जाणाऱ्या ६८’व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारात सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट विभागात ‘गोष्ट एका पैठणीची’ या चित्रपटाने पुरस्कार पटकावला आहे. या चित्रपटात मुख्य भूमिकेत मराठी अभिनेत्री सायली संजीव दिसत आहे. या चित्रपटानंतर सायली भावुक झाल्याचे पाहायला मिळाली.
या पुरस्काराविषयी व्यक्त होत सायली संजीव म्हणाली कि, मला आमच्या प्रयत्नांना मिळालेलं यश पाहून अत्यंत आनंद होतोय. कारण संपूर्ण टीमने दिवसरात्र घेतलेली मेहनत यात दिसून येते. तर दुसरीकडे, बाबा मला तुमची आठवण येतेय. या आनंदाच्या क्षणी तुम्ही हवेच होता असं सारखं वाटत’. ‘प्लॅनेट मराठी आणि गोल्डन रेशो फिल्म्स सोबतच लेकसाइड प्रोडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर अक्षय विलास बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि चिंतामणी दगडे हे या चित्रपटाचे निर्माते आहेत.शिवाय शंतनू गणेश रोडे यांनी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात सायली संजीव, सुव्रत जोशी, शशांक केतकर, मिलिंद गुणाजी, मृणाल कुलकर्णी या कलाकारांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत.
तसेच या चित्रपटाच्या टीमने प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. एक पोस्ट शेअर करीत लिहिले आहे कि, ‘गोष्ट एका पैठणीची या आमच्या चित्रपटाचा जो सन्मान झालाय, जे प्रेम मिळतंय हा आम्हा सगळ्यांसाठी खूपच आनंदाचा आणि इमोशनल क्षण आहे. ६८’व्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात ‘गोष्ट एका पैठणीची हा सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट ठटलाय, प्लॅनेट मटाठीचं कुटुंब, गोल्डन रेशो, चित्रपटातील कलाकार, दिग्दर्शक शंतनू टोडे तंत्रज्ञ ह्या सगळ्यांचे हे यश आहे. दोन वर्षापासून कोव्हिडमुळे अनेक अडचणींचा सामना सगळ्यांना कटावा लागला. पण आता ‘गोष्ट एका पैठणीचीच्या झालेल्या सन्मानामुळे सगळ्या टीमच्या चेहऱ्यावर हास्याची झालर पसरली आहे. प्रेक्षकांना अशीच दर्जेदार कलाकृती देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. – टीम गोष्ट एका पैठणीची आणि प्लॅनेट मराठी
Discussion about this post