Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

किरण- राखीची कजरारे केमिस्ट्री पाहून नेटकरी म्हणाले, ‘माने.. अहो बायको बघतेय’

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 10, 2022
in Trending, TV Show, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
0
SHARES
1.3k
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बिग बॉसच्या चौथ्या पर्वात ड्रामाक्वीन राखी सावंतची एंट्री झाल्यापासून अख्ख घर जणू राखीमय झालं आहे. या घरात आता राखीचा आवाज सगळ्यात पहिला आणि सगळ्यात जास्त येतो. मुळात तिला उगाच थोडीच ड्रामाक्वीन म्हणतात. काहीतरी मसालेदार केल्याशिवाय तिच्या आयुष्याला चवचं कुठे येते. कधी भांडते, कधी चिडते, कधी रागावते, कधी मारायला उठते तर कधी दिवसभर गॉसिप आणि मजा मस्तीत राखी व्यस्त असते. सध्या घरात ती अक्षय केळकर आणि किरण माने यांच्यासोबत कजरारे कजरारे करताना दिसतेय.

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

बिग बॉस मराठीच्या घरात राखी कधी किरण मानेंना मागे मागे फिरवताना दिसली. तर कधी प्रसाद जवादेसोबत फ्लर्ट करताना दिसली. इतकंच काय तर आरोह वेलणकरसोबत भांडतानासुद्धा दिसली. यानंतर आता राखी अक्षय केळकर आणि किरण मानेंसोबत केमिस्ट्री जमवत ऐश्वर्या रायच्या जबरदस्त हिट कजरारे .. कजरारे .. या गाण्यावर थिरकताना दिसतेय. नुकताच रिलीज झालेल्या प्रोमोमध्ये राखी कजरारे गाण्यावर अगदी तालात ठेका धरताना दिसते आहे. तिच्यासोबत अक्षय केळकर आणि किरण मानेसुद्धा ठुमके लगावताना दिसतो आहे. हा व्हिडीओ पाहून मात्र मानेंच्या चाहत्यांनी त्यांना सावध होण्याचा इशारा दिला आहे.

View this post on Instagram

A post shared by Kiran Mane (@kiranmane7777)

किरण माने आणि राखीची केमिस्ट्री ती घरात आल्यापासून चांगली दिसत आहे. याआधी किरण माने राखीच्या मागे मागे अख्ख्या घरात फिरताना दिसले. बागडताना दिसले. तिचा पदर धरून वाहताना दिसले. यानंतर आता तिच्यासोबत थिरकताना दिसले. त्यामुळे प्रेक्षकांनी किरण मानेंना बाहेर बायको आहे याची आठवण करून दिली आहे आणि सोबतच सावधानतेचा इशारा दिला आहे.

बिग बॉस मराठीच्या यंदाच्या सिजनचा उतरता टीआरपी पाहून मेकर्सने राखी सावंतला या पर्वात आधी चॅलेंजर म्हणून आणि त्यानंतर वाईल्ड कार्ड सदस्य म्हणून घोषित केलं. एंटरटेनमेंटबद्दल बोलायचं तर राखी कुठेच कमी नाही. पण बाकीच्या स्पर्धकांसोबत जिंकण्यासाठी ती कशी दोन हात करते हे पाहणं औत्सुक्याचे आहे.

Tags: Bigg Boss Marathi 4colors marathiKiran Manerakhi sawantViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group