हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात असा काही पाऊस सुरु आहे, कि या पावसाने अनेक ठिकाणी कहर केला आहे. पावसाच्या सलग पडण्यामुळे कित्येक धरणं, नद्या दुथडी भरून वाहत आहेत. त्यामुळे धरणांचे पाणी सोडण्यात आले असून अनेको नद्यांना पुर आला आहे. यामुळे कित्येक गावं पाण्याखाली गेली आहेत. तर रायगड आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळल्यामुळे कित्येकांचे संसार आणि निष्पाप लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. यात चिपळूण, रायगड, कोल्हापूर या जिल्ह्यात पावसाचा चांगलाच तडाखा बसला आहे. हे पाहता कोकणातील लोकांच्या मदतीसाठी सध्या अनेक लोक पुढे सरसावले आहेत. इतकेच नव्हे तर, मराठी अभिनेता भरत जाधव याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आपल्या कोकणासाठी आपलेपणाने मदत करण्याचे आवाहन केले आहे.
अभिनेता भरत जाधवने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्याने एक संदेश दिला आहे. युथ फॉर डेमॉक्रसी आपल्या कोकणाला देऊया मदतीचा हात जास्त दिवस टिकतील असे अन्न पदार्थ, कुटुंबातील जीवनावश्यक वस्तू, महिला व पुरुषांना लागणारी सर्व प्रकारची अंतर वस्त्रे, अंथरून-पांघरुण मदत कुठे आणि कशी कराल यासाठी त्याने फोन नंबर देखील दिले आहेत. ही पोस्ट शेअर करत ‘आपलं कोकण हे फक्त वीकेंड ट्रीप एन्जॉय करण्यापुरतं नाही. या पूर संकटात आपापल्या परीने शक्य ती कोकणाला साथ द्या,’ असे कॅप्शन त्याने दिले आहे.
पावसाचा जोर इतका होता कि सध्या अनेको ठिकाणी त्याचा चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. तळई गावात दरड कोसळून तब्बल ३६ जणांचा बळी गेला आहे. तर महाड आणि चिपळूण शहरांमध्ये पूर आला असून अख्खी शहरे पाण्याखाली गेली आहेत. तर पुरात व भूस्खलनामुळे ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी व त्यांचे स्थलांतर करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेशही दिले आहेत. तर संपूर्ण महाराष्ट्रात १२९ च्या जवळपास लोकांचा बळी गेला आहे.
Discussion about this post