हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। कोरोना विषाणूचा वाढत संसर्ग पाहता सद्यस्थिती आधीहून बिकट होऊ लागली आहे. कुठे ऑक्सिजनचा तुटवडा आहे. तर कुठे रुग्णांना बेड मिळत नाही. इतकेच नव्हे तर आता बाधितांच्या संख्येसमोर औषधांचा आणि लसींचाही तुटवडा भासतेय. तूर्तास ४५ वर्षावरील नागरिकांना लास दिली जात आहे मात्र शासनाने दिलेल्या आदेशानुसार येत्या १ मे पासून १८ वर्षावरील सर्वाना लास देण्यात येणार आहे. पण लसीकरणाबाबत म्हणायचे झाले तर अनेक ठिकाणी लोक लस मिळेल या आशेने रांगेत उभे दिसत आहे. खरतर त्यांना हे देखील माहित नाही कि त्यांना लस मिळेल का नाही. लसीकरण केंद्रावरील गर्दी आणि यामुळे सामान्यांना होत असलेला त्रास यावर भाष्य करणारी परखड पोस्ट मराठी अभिनेता हेमंत ढोमे याने लिहून शेअर केली आहे.
सर्व नियम पाळणारा… सरकार ला प्रामाणिक पणे टॅक्स भरणारा… या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणुस आत्ता आरोग्य सुविधांसाठी (जगण्यआसाठी) रांगेत उभा आहे! उन्हा-तान्हाचा कुठल्याही सावली शिवाय… खूप वय असलेला, थकलेला! आत्ता नेस्को (गोरेगाव, मुंबई) बाहेर लांब रांग! pic.twitter.com/P08ELQOMH4
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 24, 2021
अभिनेता हेमंत ढोमे याने मुंबईतील गोरेगाव या ठिकाणी लसीकरणासाठी आलेल्या सामान्य नागरिकांच्या रंगांचे फोटो शेअर केले आहेत. उन्हा तान्हाची उभी माणसे पाहून हेमंतला राग आवरता आला नाही. त्याने तडक या सामान्यांना होणार त्रास त्याच्या पोस्टमध्ये मांडला आहे. तो म्हणाला,’ सर्व नियम पाळणारा… सरकार ला प्रामाणिक पणे टॅक्स भरणारा… या देशावर प्रचंड प्रेम असणारा माझा सामान्य माणुस आत्ता आरोग्य सुविधांसाठी (जगण्यआसाठी) रांगेत उभा आहे! उन्हा-तान्हाचा कुठल्याही सावली शिवाय… खूप वय असलेला, थकलेला! आत्ता नेस्को (गोरेगाव, मुंबई) बाहेर लांब रांग!’
कमीत कमी १ किमी तरी… हजारो लोक आहेत! गेटवर चेंगरा चेंगरी… social distancing चा पत्ता नाही! एवढं करून #vaccine मिळेल की नाही हे सुद्धा माहित नाही… सारी व्यवस्था कोलमडलीय… माणसाला माणसासारखं तरी वागवा… महासत्ता होणार म्हणे… महाथट्टा नक्कीच झालीय…
— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 24, 2021
पुढे पोस्टवर रिप्लाय करत म्हणाला, ‘कमीत कमी १ किमी तरी… हजारो लोक आहेत! गेटवर चेंगरा चेंगरी…सोशल डिस्टन्सिंगचा पत्ता नाही! एवढं करून #व्हॅक्सिन मिळेल की नाही हे सुद्धा माहित नाही… सारी व्यवस्था कोलमडलीय… माणसाला माणसासारखं तरी वागवा… महासत्ता होणार म्हणे… महाथट्टा नक्कीच झालीय…’, असे म्हणत त्याने लोकांची व्यथा आणि आपला संताप या पोस्टमध्ये व्यक्त केला आहे. हेमंतची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होऊ लागलीये.
रक्तदान…
राष्ट्रहितासाठी, महाराषट्र राज्यासाठी पुढे या आणि आपलं योगदान द्या!
मी करतोय… तुम्हीही करा…
चांदीवली, संघर्षनगर वसाहत मधील सर्व डॅाक्टर्स आणि शिवज्योत दौड मधील माझ्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा! तुमच्या कार्याचं खूप कौतुक आणि अभिमान!!! #MahaCovid pic.twitter.com/e2svB2ayXT— Hemant Dhome | हेमंत ढोमे (@hemantdhome21) April 25, 2021
हेमंतने नुकतेच स्वतः रक्तदान केले आहे आणि इतरांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्याने म्हटले आहे कि, रक्तदान… राष्ट्रहितासाठी, महाराषट्र राज्यासाठी पुढे या आणि आपलं योगदान द्या! मी करतोय… तुम्हीही करा… चांदीवली, संघर्षनगर वसाहत मधील सर्व डॅाक्टर्स आणि शिवज्योत दौड मधील माझ्या सर्व सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा! तुमच्या कार्याचं खूप कौतुक आणि अभिमान!!!
Discussion about this post