हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही काळात अनेक विनोदवीरांनी जगाचा आणि मनोरंजन सृष्टीचा निरोप घेत चाहत्यांच्या डोळ्यात पाणी आणलं. यानंतर हे दुःख ओसरतेच तोवर मनोरंजन सृष्टीतून आणखी एक दुःखद बातमी समोर आली आहे. विविध लक्षवेधी भूमिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर आपल्या अभिनयाचा ठसा उमठवणारे बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांची प्राणज्योत आज मालवली. अरुण बाली हे गेल्या काही दिवसांपासून सतत गंभीर आजारी होते, अशी माहिती मिळाली आहे. त्यांच्या निधनाने मनोरंजन सृष्टीत शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनूसार, बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अरुण बाली यांच्या निधनादरम्यान त्यांचे वय ७९ होते. गेल्या काही काळापासून त्यांच्या मागे सतत आजारपण लागले होते. या आजारपणामुळे त्यांना काही महिन्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दरम्यान त्यांच्या मुलीने माध्यमांना त्यांच्या तब्येतीविषयी माहिती दिली होती. तेव्हा त्यांनी सांगितले होते की, आपले वडील म्हणजेच अभिनेते अरुण बाली मायस्थेनिया ग्रेविस नावाच्या ऑटोइम्यून आजाराने ग्रस्त होते. या आजारामध्ये नसा आणि स्नायू यांच्यामध्ये अडथळा निर्माण होतो.
हा आजार झाल्यापासून बाली हे सतत आजारी होते. दरम्यान अनेकदा त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागले होते. मात्र, यावेळी त्यांनी शस्त्र टाकली आणि आजरापुढे हात टेकले. आज बॉलिवूड मनोरंजन सृष्टीने आणखी एक तारा गमावला. अरुण बाली यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ९०च्या दशकात केली. ‘राजू बन गया जेंटलमन’, ‘फूल और अंगारे’, ‘खलनायक’, ‘3 इडियट्स’, ‘केदारनाथ’ आणि ‘पानिपत’ यासारख्या विविध प्रसिद्ध आणि गाजलेल्या कलाकृतींचा ते भाग राहिले आहेत.
Discussion about this post