हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। टीव्ही जगतातील अत्यंत लोकप्रिय झालेले आणि अद्याप आठवणीत असलेले ‘रामायण’ या मालिकेत रावणाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचे निधन झाले आहे. दरम्यान ते ८२ वारशाचे होते.अरविंद त्रिवेदी यांनी रामानंद सागर यांच्या ‘रामायण’ या अध्यात्मिक मालिकेत रावणाची भूमिका साकारली होती. त्यामुळे ते आजही आठवणीत जसेच्या तसे आहेत. माहितीनुसार, आज मुंबईतील डहाणूकरवाडी स्मशानभूमी येथे त्रिवेदी यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. ते गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. यानंतर काल रात्री हृदय विकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूची पुष्टी त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी केली.
‘रामायणात रावण साकारणारे अरविंद त्रिवेदी आजही रावणाच्या अजरामर पात्रामुळे लोकांच्या लक्षात आहेत. याशिवाय त्रिवेदी यांनी टीव्ही मालिका ‘विक्रम आणि वेताळ’मध्येही काम केले होते. ही मालिकादेखील बरीच गाजली होती. अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेश येथील उज्जैन शहरात झाला होता. त्रिवेदींनी त्यांच्या मनोरंजन क्षेत्रातील कारकिर्दीची सुरुवात गुजराती रंगमंचावरून केली होती. शिवाय त्यांचे भाऊ उपेंद्र त्रिवेदी हे गुजराती चित्रपट सृष्टीतील एक चर्चित नाव आहे. गुजराती भाषेतील धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांमधून अरविंद त्रिवेदी यांनादेखील एक विशेष ओळख प्राप्त होती.
RIP #ArvindTrivedi
'रामायण' में रावण का किरदार निभाने वाले अरविंद त्रिवेदी का हार्टअटैक से निधन#Ramayana #Ravana #doordarshan pic.twitter.com/7Hwjb6Vv7M— Filmania Entertainment (@_filmania) October 6, 2021
त्रिवेदी यांनी किमान 300 हिंदी आणि गुजराती चित्रपटांमध्ये काम केले आहे. तर २००२ सालामध्ये त्यांना सेंट्रल बोर्ड फॉर फिल्म सर्टिफिकेशनचे (सीबीएफसी) कार्यवाह अध्यक्षपद मिळाले होते. याशिवाय १९९१ सालामध्ये भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर ते खासदारही झाले होते. मिळालेल्या माहितीनुसार, त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून आजारी होते. इतकेच नव्हे तर याच वर्षी मे महिन्यात त्यांच्या मृत्यूची अफवादेखील पसरली होती. तेव्हा त्यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी पुढे येऊन अरविंदजी यांची प्रकृती पूर्णपणे बरी असल्याचे सांगितले होते. शिवाय कोणतीही फेक न्यूज पसरवू नये, अशी विनंतीही त्यांनी केली होती.
Discussion about this post