हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीला वेगळे दिवस दिसण्यामागे अनेक कलाकारांचा हात आहे. कित्येक कलाकारांनी आपल्या वयाची अत्यंत महत्वाची वर्ष फक्त आणि फक्त सिनेसृष्टीला दिली आहेत. विविध कथानक, विविध विषय हाताळत अनेक कलाकारांनी प्रेक्षकांमध्ये आपली जागा निर्माण केली आहे. कधी हसत तर कधी हसवत, कधी भावनिक होऊन डोळ्यात पाणी आणत, लोकांच्या भावना तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळत या कलाकारांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. या कलाकारांमध्ये दिग्गज म्हणता येईल असे कलाकार म्हणजे, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, अशोक सराफ आणि सचिन पिळगांवकर, मोहन जोशी असे अजून बरेच कलाकार या यादीत समाविष्ट आहेत.
लक्षा, सचिन, अशोक, महेश यांच्या जोड्या गेली कित्येक वर्ष मनोरंजन सृष्टीवर राज्य करत आहेत. मात्र लक्षाच्या एक्झिटनंतर सगळं कसं भकास वाटू लागलं. पण हि दोस्ती तुटायची नाय म्हणत इतर कलाकार नेहमीच एकमेकांच्या संगतीत राहताना दिसले. काही तासांपूर्वी सचिन पिळगांवकर यांनी सोशल मीडियावर विमानातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांच्यासह मराठी सिनेइंडस्ट्रीतील दिग्गज तारे देखील दिसत आहेत. सचिन स्वतः लेजेंड्सपैकी एक आहेतच. पण या फोटोत एकावेळी सचिन पिळगांवकर, अशोक सराफ, मोहन जोशी या त्रिकुटासह जयंत वाडकर देखील दिसत आहेत.
हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. मुख्य म्हणजे हा फोटो पाहून नेटकरी प्रचंड खुश झाले आहेत. एकाच फ्रेममध्ये इतक्या साध्या अवतरत मराठी सिनेसृष्टीतील लेजेंड्स असणं हि फार मोठी बाब आहे. अनेक नेटकऱ्यांनी हा फोटो पाहून आपला आनंद व्यक्त केला आहे. मुख्य म्हणजे सचिन यांनी फोटो शेअर करताना फ्लाईंग टू नागपूर असं लिहिलं आहे. त्यामुळे हे सारे कलाकार मिळून एकत्र नागपूरला गेले आहेत तेव्हढं समजत. पण नेमकी ही टूर कशासाठी असेल याच उत्तर काही माहित नाही. आता हे दिग्गज एकाच प्रोजेक्टमध्ये दिसणार असतील तर सोने पे सुहागाचं म्हणावं लागेल.
अनेक नेटकऱ्यांनी हा फोटो पाहून असा अंदाज लावला आहे कि, हे दिग्गज एकत्र एक नवा प्रोजेक्ट घेऊन येत आहेत. तर कुणी म्हणाल कि यांच्याशिवाय मराठी सिनेसृष्टीला पर्याय नाही. याशिवाय काय ते विमान, काय ते ढग, काय ते त्रिकुट अशीही कमेंट एकाने केली आहे. अनेकांनी सांभाळून या.. वेलकम टु नागपूर.. लवकर या आम्ही प्रतीक्षेत आहोत… अशाही कमेंट केल्या आहेत.
Discussion about this post