Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

अक्षया नाईकची ट्रोलर्सला चपराक म्हणाली; सुंदर असणं याचा वजनाशी काय संबंध?

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 21, 2021
in फोटो गॅलरी, बातम्या, लाईफस्टाईल, व्हिडिओ
Akshaya Naik
0
SHARES
0
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। इंडस्ट्रीत काम करायचं असेल तर मापात असावं लागत. म्हणजेच अगदी स्लिम ट्रिम, झिरो फिगर विथ ग्लॅमर. खरतर हा असा काही रूल नाही. पण नजरेचा काय करणार? इथेच तर घोड अडत ना. हिरोईनचे वजन हा मोठा संवेदनशील विषय झाला आहे. करिनाने झिरो फिगरचा ट्रेंड काय आणला आणि नट्या वजनाबद्दल कमालीच्या काटेकोर झाल्या. इंडस्ट्रीतील अभिनेत्रींचे सोडाच अगदी सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या मुलीही वजनाबद्दल नको तितकी काळजी घेऊ लागल्या. इतक्या की, स्लिम फिगर सुंदरतेच प्रतीक होऊ लागलय. म्हणूनच सुंदर मनामध्ये भरली मालिकेतील मुख्य अभिनेत्री अक्षय नाईकने एक लांबलचक पोस्ट शेअर करत, वजनावरून मुलींना हिणवणा-यांचे कान टोचले आहेत.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

समाजाची दृष्टी इतकी हीन झाली आहे कि, लठ्ठ मुलींना आणि काहीशा गोबऱ्या गालाच्या हिरोईन्सला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले. अगदी सोनाक्षी सिन्हा, विद्या बालन, हुमा कुरेशी या अभिनेत्री बॉडी शेमिंंगच्या बळी पडल्या. पण या अभिनेत्रींनी ‘बॉडी शेमिंग’ अर्थात वजनावरून हिणवणा-यांच्या तोंडावर जोरदार चपराक मारण्याची हिंमत दाखवली.  अक्षयानेही पोस्ट करत बॉडी शेमिंग करणा-यांना तिखट शब्दांत बोल देत सणसणीत लालेलाल चपराक दिली आहे.  तर पुढे पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये इंडस्ट्रीत वजनावरून हिरोईन शोधणाऱ्या गटाची देखील निंदा केली आहे.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

कृपा करून एखाद्याला त्याच्या शरीरावरून ओळखणं बंद करा. त्यांच्या शरीरासोबत त्यांच्या भावनासुद्धा आहेत, त्यांचाही विचार करा, अशा शब्दांत तिने बॉडी शेमिंग करणा-यांना सुनावले आहे. ती म्हणतेय, ‘ जास्त हेल्थी असणा-या मुली खरं तर खूप बिनधास्त असतात. त्या खूप मुक्तपणे जगत असतात. त्यांना वाढलेल्या वजनाचं मुळीचं आश्चर्य वाटतं नाही. उलट त्या खूपच आत्मविश्वासी असतात. स्वत:चे शरीर जसं आहे तसं त्या स्वीकारतात आणि मला ही लोकं खूप आवडतात. मी नेहमी जास्त वजनाबद्दल सकारात्मकच बोलत असते मात्र आज मी काही वैयक्तिक अनुभव सांगणार आहे आणि ते प्रत्येक जाड व्यक्तीवर लागू होतं.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

मला माहिती आहे, मी आत्मविश्वासी आहे, बिनधास्त आहे मात्र प्रत्येक व्यक्ती असेलच असं नाही. अनेक लोकं या प्रसंगातून जातात त्यांना आपल्या वजनावरून खूप काही सोसावं लागतं. आपण विचारही करू शकत नाही इतकं ते सहन करतात. माझ्यासारखे लोक प्रत्येकवेळी या समाजापासून स्वत:चं संरक्षण करत असतात. आम्हाला काही फरक नाही पडत, आम्ही जसे आहोत तसे आनंदी आहोत, असं असं म्हणून समाज काय म्हणतंय याकडे फारसं लक्ष देत नाहीत. आणि हे खरंच आहे आम्हाला माहिती आहे आम्ही किती सुंदर आहोत.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Naik (@akshayanaik12)

मात्र प्रत्येकवेळी आम्हाला आमच्या जाड शरीरावरून नाकारलं जातं. आम्हाला अशी जाणीव करून दिली जाते की आम्ही सुंदर नाही. तू गुबगुबीत, जाड आहेस पण सुंदर आहेस, असे लोक मला येऊन म्हणतात तेव्हा मला हसू येतं. अहो, माझ्या सुंदर असण्याचा आणि वजनाचा काय संबंध? कृपा करून वजनावरून एखाद्याला जज करणे सोडा. कारण प्रत्येकाला भावना असतात़ त्या सुद्ध्द्धा जपायला शिका.’

Tags: Akshaya NaikAll Healthy GirlsBody Shamingcolors marathiInstagram Social PostLifestyleSundara Manamdhye Bharali
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group