हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी मनोरंजन विश्वातील छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय जोडी म्हणजे राणा दा आणि पाठक बाई. अर्थात अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर. आज यांचा विवाह सोहळा मोठ्या जल्लोषात पार पडणार आहे. त्यांच्या लग्न मंडपाचे आणि लूकचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण सगळ्यात जास्त व्हायरल होत असलेला व्हिडीओ आहे संगीत सेरेमनीचा. आता दोस्तांच्या लग्नात दोस्तांनी नाही नाचायचं तर कुणी नाचायचं.
राणा दा आणि पाठकबाईंच्या संगीत सेरेमनीचा जंगी सोहळा काल संपन्न झाला. यासाठी अक्षया आणि हार्दिकने अतिशय सुंदर लूक केला होता. यावेळी अक्षया जणू परी भासत होती. तर दोघांच्याही चेहऱ्यावर लग्नाचं तेज दिसून येत होत. त्यांच्या संगीत सेरेमनीसाठी अक्षयाने व्हाईट हाफ ब्लु रंगाचा डिझायनर लॉन्ग फ्रॉक गाऊन परिधान केला होता.
तर हार्दिकने व्हाईट सुद्धा तिला मॅचिंग कोट परिधान केला होता. यावेळी त्यांचे नातेवाईक, मित्रपरिवार व कुटुंबियांच्या उपस्थितीत अक्षया- हार्दिकने देखील संगीत सोहळ्यात परफॉर्मन्स केला. पण गाजला तो ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील कलाकारांचा परफॉर्मन्स.
मालिकेदरम्यान एकत्र काम केल्यानंतर त्यांची अशी काही गट्टी जमली आहे कि काही बोलायचं काम नाही. मॅचिंग मॅचिंग कपडे घालून संगीत सेरेमनी एन्जॉय करणाऱ्या वर वधू म्हणजेच हार्दिक- अक्षयासाठी या कलाकारांनी ‘मॅचिंग नवरा पाहिजे’ या हटके गाण्यावर भन्नाट परफॉर्मन्स केला.
अभिनेत्री वीणा जगतापनेही या संगीत सोहळ्यात ठुमके लावत चार चांद लावले. याशिवाय हार्दिक अक्षयाच्या हळदीचे फोटो आणि व्हिडीओ देखील सोशल मीडियावर कमाल व्हायरल झाले आहेत. तर अक्षयाच्या मेहंदी सेरेमनीचे फोटो आणि व्हिडीओ देखील चर्चेत आहेत.
Discussion about this post