हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। स्टार प्रवाह वाहिनी सध्या आघाडीच्या वाहिन्यांपैकी एक मराठी वाहिनी आहे. स्टार प्रवाह वरील आईंक मालिका तुफान गाजताना दिसत आहेत. प्रेक्षक भरभरून या मालिकांवर प्रेम करत आहेत. तर IMDb च्या रेटिंग लिस्टमध्ये देखील स्टार प्रवाहच्या अनेक मालिकांचा समावेश आहे. या मालिकांपैकी एक ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ हि मालिका आहे. या मालिकेतील एका महत्वपूर्ण भूमिकेची रिअल लाईफ एक्झिट झाली आहे आणि हा मालिका विश्वासाठी अत्यंत मोठा धक्का आहे. अभिनेता अरविंद धनु यांचे निधन झाल्याची बातमी समोर आली आहे.
मराठी चित्रपट आणि मराठी मालिकांमध्ये काम करणारे लोकप्रिय अभिनेते अरविंद धनू यांच्या निधनाची बातमी एव्हाना सर्वत्र पसरली आहे. या बातमीमुळे मालिका विश्वाचं मोठं नुकसान झालं आहे. अरविंद यांची एक्झिट मालिका विश्वाला चटका लावणारी ठरली आहे. वयाच्या ४७ वर्षी अभिनेता अरविंद धनु यांचे निधन झाले आहे. अनेक मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केल्यानंतर गेल्या बऱ्याच काळापासून ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेत दिसून येत होते. या मालिकेत त्यांनी शालिनीच्या वडिलांची भूमिका साकारली होती.
अरविंद धनु यांच्या पश्चात केवळ पत्नी आहे. माहितीनुसार, दिनांक २५ जुलै २०२२ रोजी रात्री उशिरा त्यांच्यावर माहीम येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. रिपोर्टनुसार, अभिनेते अरविंद धनू हे मुंबईतील एका कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र या सगळ्यात त्यांची प्रकृती आणखीच खालावली. अखेर त्यांना ब्रेन स्ट्रोकचा तीव्र झटका आला आणि उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.
Discussion about this post