हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानचा एकुलता एक लेक आर्यन खान सध्या मुंबई क्रूज ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये आहे. या प्रकरणानंतर यामध्ये काहीजण आर्यनवर आणि साहजिकच त्याचे पिता अभिनेता शाहरुख खान यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करताना दिसत आहेत. तर काहीजण मात्र आर्यन खानला समजून घेण्याची भूमिका वठवताना दिसत आहेत.
या सर्व प्रकरणादरम्यान शाहरुख आणि आर्यन यांच्या पाठीशी अख्ख बॉलिवूड उभं राहील असताना आता ज्येष्ठ अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया देत एक शंका सर्वांसमोर उपस्थित केली आहे.
माध्यमांशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा याना विचारण्यात आले कि, बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा ट्रेंड वाढतोय का? तर या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, की छोट्या स्तरावर अशा गोष्टी घडत असतील पण ते जेवढ्या प्रमाणात सांगितलं जातंय, तेवढं तरी नक्कीच नाही. तसेच बॉलिवूड स्टार शाहरुख खान मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी निशाण्यावर असू शकतो. कारण, ‘आर्यनकडून ड्रग्स जप्त करण्यात आलेले नाहीत. त्याची रक्त तपासणी करण्यात आलेली नाही, लघवीची चाचणी करण्यात आलेली नाही आणि या कथित अटकेमध्ये काही पक्षांचे लोकही सहभागी होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेले आरोप लक्षात घेण्यासारखे आहेत. त्यांचे सर्व आरोप कदाचित खरे नसतील पण तपास हा झालाच पाहिजे,’ असे म्हणत शत्रुघ्न सिन्हा यांनी उल्लेख न करता NCB च्या कारवाईवर शंका उपस्थित केल्याचे निदर्शनास येत आहे.
Honourable Cabinet Minister @nawabmalikncp Sahab said he will share few videos where fraud and Corrupt NCB director Sameer Wankhede met BJP leaders
Conspiracy against #ShahRukhKhan And his son #AryanKhan by BJP!! #WeStandWithAryanKhan #SRK #WeStandWithSRK #ReleaseAryanKhan pic.twitter.com/k7J4F2iMhJ
— Faisal Islam (@iamfaisalislam) October 12, 2021
मुंबई क्रूज ड्रग्स पार्टी प्रकरणात अटक करण्यात आलेला बॉलिवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानच्या वकिलांनी ११ ऑक्टोबर २०२१ अर्थात सोमवारी पुन्हा एकदा सत्र न्यायालयात जामीन याचिका दाखल केली होती. यावर, न्यायालयाने या प्रकरणाच्या सुनावणीची तारीख १३ ऑक्टोबर २०२१, बुधवार अशी निश्चित केली आहे. त्यामुळे आर्यन खानच्या जामिनावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. गेल्या शनिवारी रात्री मुंबई किनाऱ्यावर गोव्याला जाणाऱ्या क्रूझ जहाजावर छापा टाकल्यानंतर बरेच मोठे धागेदोरे NCBच्या हाती लागले आहेत. दरम्यान आतापर्यंत या प्रकरणात १८ जणांना अटक करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून समजले आहे.
Discussion about this post