हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बडे बडे शहरो में छोटी छोटी बाते होती रहती है, म्हणणारा शाहरुख याच मोठ्या शहरात मोठमोठ्या गोष्टींमुळे सारखाच चर्चेत असतो. कधी वैयक्तिक कारणांमुळे तर कधी ट्रोलिंगमूळे. याशिवाय अभिनेत्री दीपिका पदुकोण तिच्या ग्लॅमरस अंदाजामुळे नेहमी चर्चेत असते. आगामी चित्रपट पठाण’मध्ये शाहरुख आणि दीपिका यांची जबरदस्त केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्याची पहिली झलक या चित्रपटातील ‘बेशरम रंग’ या गाण्यातून समोर आली आहे. या गाण्याच्या कोरिओग्राफीवर ट्रोलर्स तर तुटून पडले आहेत.
Pan Parag Lux Chintu chips award guaranteed for the best choreographer 🙄 pic.twitter.com/0C1ibMb99w
— Badass Dad 🚬 🍺 (@Badass_Superdad) December 12, 2022
शाहरुखचा बहुचर्चित ‘पठाण’ हा चित्रपट २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून शाहरुख ४ वर्षांनंतर पुन्हा मोठा पडदा गाजवणार आहे. अशातच त्याच्या या चित्रपटातील पहिलं गाणं बेशरम रंग रिलीज झालं आहे. ज्यामध्ये शाहरुख आणि दीपिकाची रोमँटिक केमिस्ट्री पहायला मिळते आहे. एकीकडे या गाण्यात शाहरुखचा डॅशिंग लूक तर दुसरीकडे दीपिकाचा बोल्ड अवतार आपले लक्ष वेधून घेत आहे. पण ट्रोलर्सचे लक्ष मात्र या गाण्याच्या कोरिओग्राफीने वेधले आहे.
Kya wahiyat dance hai
— exsecular (@ExSecular) December 12, 2022
नेटकरी या गाण्याला प्रत्येक माध्यमातून ट्रोल करू लागले आहेत. रेड्डीट वेबसाइट पासून ते युट्युब, ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक सगळीकडे लोकांनी या गाण्याच्या चित्रीकरणाची खिल्ली उडवली आहे.
Ye dance hai??? Mujhe laga koi porn movie ki shooting hai shayad.
— Anil Rana (@ranaanil2003) December 12, 2022
या गाण्यात शाहरुखचा वावर बेगडी वाटत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. शिवाय सगळंच किती खोटं खोटं वाटतंय, हा डान्स पाहण्यापेक्षा डोळे मिटलेले बरे, याहून चिप डान्स बसवणे शक्यच नाही अशा विविध प्रतिक्रिया देत कोरिओग्राफरला ट्रोल केले आहे.
kya wahiyat dance hai🙄 no grace at all
there is a difference between sexy and cheap 😢— जीवनदायीनी (@jeevandayni) December 12, 2022
अनेकांनी तर असेही म्हटले आहे कि, हे गाणे गायक जेनच्या ‘माकेबा’ गाण्याची कॉपी आहे. माहितीनुसार, येत्या वर्षात २६ जानेवारी २०२३ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यामध्ये शाहरुख खान, दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम यांच्या मुख्य भूमिका आहेत.
Discussion about this post