Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

Shahrukh khan Birthday: हॅपी बर्थडे किंग खान! SRK साजरा करतोय 57’वा वाढदिवस; जाणून घ्या आवड- निवड

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
November 2, 2022
in Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
SRK
0
SHARES
82
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। (Shahrukh khan Birthday) बॉलिवूडचा किंग खान म्हणजेच अभिनेता शाहरुख खान याचा आज ५७ वा वाढदिवस आहे. जगभरातून त्याचे असंख्य चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करताना दिसत आहेत. मुंबईत शाहरुखच्या निवासस्थानी म्हणजेच ‘मन्नत’जवळ रात्रीपासूनच चाहत्यांनी तुफान गर्दी केली होती.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

यानंतर आज शाहरुखने चाहत्यांच्या उपस्थितीला मान देऊन त्यांच्या शुभेच्छांचा स्वीकार केला. हात फैलावत त्याने सर्वाना अभिवादन केले. चाहत्यांसाठी आणि अभिनेत्यासाठी हा क्षण अत्यंत भावुक होता. आज शाहरुखचा वाढदिवस आहे आणि म्हणूनच आज आपण त्याच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेणार आहोत. (Shahrukh khan Birthday)

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

दिनांक २ नोव्हेंबर १९६५ रोजी शाह रुख खान याचा जन्म नवी दिल्ली येथे झाला. सेंट कोलबा स्कुलमध्ये त्याने आपले शालेय शिक्षण पूर्ण केले. तर हंसराज महाविद्यालयात त्याने पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून त्याने मास कम्युनिकेशन पूर्ण केले. एकेकाळी धावपटू होण्याचे स्वप्न राशी बाळगणाऱ्या शाहरुखला बॉलिवूड सिने इंडस्ट्रीकडे वळण्यात काहीही रस नव्हता.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

मात्र नशिबाने त्याला ओढून आणलंच आणि १९९२ साली शाहरुखने ‘दिवाना’ या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण केले. मात्र याआधी तो १९८९ मध्ये ‘फौजी’ या हिंदी मालिकेत दिसला होता. त्याची हि मालिका तुफान गाजली होती. यातील शाहरुखची भूमिका आजही कित्येकांच्या लक्षात आहे.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

शाहरुखने विचारही केला नव्हता पण त्याला त्याच्या पहिल्याच चित्रपटासाठी म्हणजेच ‘दिवाना’साठी फिल्मफेअर मिळाला आणि इथून त्याचा स्वतःवरील विश्वास दुप्पट होत गेला. या यशाच्या पायरीनंतर खालील पायऱ्या त्याने पुन्हा वळून पाहिल्याच नाहीत. तो सातत्याने विविध चित्रपटांमध्ये विविध भूमिका साकारत राहिला आणि प्रेक्षकांच्या मनात आपले स्थान कायम करत गेला.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

(Shahrukh khan Birthday) त्याच्या ‘बाजीगर’ आणि ‘अंजाम’ चित्रपटातील नकारात्मक भूमिकांनी देखील प्रेक्षकांची मन जिंकली. यानंतर १९९६ मध्ये दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे म्हणजेच डीडीएलजे चित्रपट आला. या चित्रपटानंतर अवघ्या काळीच काळात शाहरुखच्या स्टाईलची तरुणांना भुरळ पडली. इथूनच त्याची ओळख ‘लव्हर बॉय’ म्हणून झाली.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

यानंतर ‘दिल तो पागल है’, ‘कुछ कुछ होता है’, ‘देवदास’, ‘स्वदेश’, ‘चक दे इंडिया’, ‘माय नेम इज खान’ अशा विविध धाटणीचे चित्रपट त्याने केला. दरम्यान १९९९ साली आलेल्या ‘बादशाह’ चित्रपटानंतर शाहरुखला ‘किंग खान’ अशी ओळख मिळाली. यानंतर भारत सरकारचा ‘पद्मश्री पुरस्कार’देखील त्याला प्रदान करण्यात आला.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

अनेक वर्ष सिने इंडस्ट्रीसाठी सातत्याने कार्यरत असणाऱ्या शाहरुखला अमाप प्रसिद्धी, लोकप्रियता, पैसा, संपत्ती मिळाली. बॉलिवूडवर राज करणाऱ्या या अभिनेत्याला कशाचीच कमी नव्हती. यश त्याच्या पायाशी लोळण घेत होत आणि अशातच त्याचा मुलगा आर्यन खान हा मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझवर झालेल्या ड्रग्ज पार्टीत सापडला.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

या प्रकरणामुळे जवळजवळ २ वर्ष शाहरुख मानहानीला सामोरी गेला. या सगळ्या प्रकारात त्याने इतक्या वर्षात कमावलेल्या फेमचा चक्काचूर झाला. मात्र कुटुंबासाठी तो झटत राहिला. माध्यमांपासून त्याने अंतर राखले. (Shahrukh khan Birthday) हे प्रकरण गेल्या काही काळात शांत झाल्यानंतर आर्यन खानने सिनेइंडस्ट्रीत लेखक म्हणून काम करण्याची तयारी दाखवली आणि एक पिता म्हणून शाहरुखने त्याला पाठिंबा दिला.

View this post on Instagram

A post shared by Shah Rukh Khan (@iamsrk)

यातच आता मोठ्या काळानंतर येत्या काळात लवकरच ‘पठाण’ आणि ‘जवान’ या चित्रपटांमधून शाहरुख आपल्या चाहत्यांच्या भेटीस येतो आहे. त्यामुळे त्याचे चाहते आणि तो स्वतः देखील या चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी प्रचंड उत्सुक आहे.

० पूर्ण नाव – शाह रुख खान
० जन्मतारीख – २ नोव्हेंबर १९६५
० आई आणि वडिलांचे नाव – लतीफ फातिमा (आई- दंडाधिकारी/ सामाजिक कार्यकर्त्या) ताज मोहम्मद खान (वडील – व्यापारी)
० पत्नीचे नाव – गौरी छिब्बर (लग्न तारीख – २५ ऑक्टोबर १९९१)
० मुलांची नावे – आर्यन खान, सुहाना खान, अबराम खान
० आवडते खाणे – तंदुरी, चायनीज, पेप्सी, कॉफी
० आवडता रंग – निळा, काळा, पांढरा
० आवडता प्राणी – कुत्रा
० आवडते खेळ – हॉकी, फुटबॉल, क्रिकेट (Shahrukh khan Birthday)
० कार कलेक्शन – ऑडी A6 लक्झरी, बेंटले कॉन्टिनेंटल GT, BMW 6 सिरीज, BMW 7 सिरीज, BMW i8, Bugatti Veyron, Mitsubishi Pajero SFX, Rolls Royce Phantom Drophead Coupe, Toyota Land, Cruiser Prado
० एकूण मालमत्ता – साधारण ₹378 + कोटी $600 दशलक्ष+ (जवळपास )

Tags: birthday specialbollywood actorShahrukh KhanViral Photos
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group