हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। शाहरुखचा ‘जवान’ सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषयी ठरतो आहे. याच पहिलं कारण म्हणजे, खूप गॅपनंतर शाहरुख प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. दुसरं कारण म्हणजे या सिनेमाचं दिग्दर्शन साऊथ चा लोकप्रिय दिग्दर्शक एटली करतोय आणि आता तिसरं कारण म्हणजे निर्मात्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. होय या चित्रपटाची कथा ज्या आशयावर आधारित आहे तो चोरी केल्याचा आरोप करीत एका तामिळ निर्मात्याने चित्रपटावर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे हा चित्रपट चांगलाच अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.
गेल्या काही काळापासून संकटांना शाहरुखवर प्रेमचं जडलं आहे. रोज काहीतरी नवं संकट त्याच्या पदरी पडत आहे. गतवर्षी त्याचा मुलगा आर्यन खान मुंबईतील कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणामूळे चर्चेत राहिला होता. ज्यामुळे शाहरुखला मानहानी सहन करावी लागली होती. यानंतर आता कुठे त्याला दिलासा मिळत होता तोवर आता आगामी चित्रपटावर हे नवे संकट आले आहे. त्याच्या आगामी आणि बहुप्रतीक्षित ‘जवान’ या चित्रपटावर गुन्हा दाखल करण्यात आल्यामुळे चित्रपटाचे प्रदर्शन नक्कीच लांबणीवर जाणार.
काही दिवसांपूर्वी शाहरुखच्या ‘जवान’ चित्रपटाची घोषणा झाली आणि सोबतच यातील त्याच्या लूकने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले. पण आता हा चित्रपट अडचणीत आला आहे. तमिळ चित्रपट निर्माते माणिकम नारायण यांनी ‘तमिळनाडू फिल्म प्रॉड्युसर्स काउन्सिल’कडे ‘जवान’ चित्रपटाविरोधात तक्रार दाखल केली आहे. या चित्रपटाची मूळ कथा तमिळ चित्रपट ‘पेरारसू’ची असून ती दिग्दर्शक अटली यांनी चोरल्याचा आरोप त्यांनी केला आहे. विजयकांत यांचा ‘पेरारसू’ हा चित्रपट २००६ साली प्रदर्शित झाला होता. ‘तामिळनाडू फिल्म प्रॉड्युसर्स काउन्सिल’ सध्या या प्रकरणाची चौकशी करत आहेत.
Discussion about this post