हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड सिनेइंडस्ट्रीत दोन खान नेहमीच चर्चेचा विषय असतात. एक म्हणजे बॉलिवूडचा भाईजान अर्थातच अभिनेता सलमान खान आणि दुसरा म्हणजे बॉलिवूडचा बादशाह अर्थात अभिनेता शाहरुख खान. सलमान आणि शाहरुख यांची दोस्ती मग दुष्मनी आणि आता पुन्हा दोस्ती हा विषय सोशल मीडियावर नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. अशातच जेव्हा भाईजान आणि बादशाह एकाच सिनेमात दिसणार असे समोर आले तेव्हा चाहत्यांमध्येही मोठी उत्सुकता पहायला मिळत आहे. यावेळी तर सलमान आणि शाहरुख एकत्र शूट करतानाचा एक व्हिडीओदेखील लीक झाला आहे. जो चांगलाच व्हायरल होत आहे.
MEGASTAR #SalmanKhan & #SRK couple of weeks before on the Set of #Tiger3 🔥🔥
THE REAL MEGASTAR SALMAN KHAN ♥️ pic.twitter.com/hFAsJ2TssR
— 𝐊𝐀𝐁𝐈𝐑 ♛ (@ISalman_Rules) June 2, 2023
अभिनेता सलमान खानचा ‘टायगर ३’ हा चित्रपट अत्यंत बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित आहे. या चित्रपटाच्या घोषणेपासूनच सलमानचे चाहते रिलीजकडे डोळे लावून बसले आहेत. या चित्रपटात सलमान खानसोबत अभिनेता शाहरुख खान कॅमिओ रोलमध्ये दिसणार असल्याचे वृत्त मध्यंतरी आले होते. तेव्हापासून या बॉलिवूडच्या करण अर्जुनला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर झाले आहेत. अशातच आगामी चित्रपट ‘टायगर ३’ च्या शूटिंग सेटवरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर लीक झाला आहे. ज्यामध्ये सलमान आणि शाहरुख एकत्र शूट करताना दिसत आहेत.
व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये आधी सलमान खान दिसतो त्यानंतर शाहरुख खान दिसतोय. लांब केस आणि दाढी असा शाहरुख खानचा लूक तुम्हाला पठाणची आठवण करून देईल. शाहरुखने तपकिरी रंगाचा टी- शर्ट आणि काळ्या रंगाची कार्गो पॅन्ट परिधान केली आहे. शिवाय त्याच्या चेहऱ्यावर जखमा दिसत आहेत. तर सलमान खान या व्हिडिओमध्ये तपकिरी रंगाचा टी- शर्ट आणि काळी पँट परिधान केलेला दिसत आहे. एकंदरच यांचा लूक पाहता ते अॅक्शन सीन शूट करत आहेत असे समजत आहे.
Discussion about this post