हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘बिग बॉस १६ चा गेम सध्या प्रेक्षकांचे मन जिंकण्यात चांगलाच यशस्वी होताना दिसत आहे. या शोमध्ये आलेला प्रत्येक स्पर्धक जिंकण्याच्या दृष्टिकोनातून खेळत आहे. त्यामुळे काळात नकळत कधी ना कधी कुणी ना कुणी दुखी होताना दिसत आहे. अशावेळी कुणाचा आवाज वाढतो तर कुणाचा आवाज दाबला जातो. या दरम्यान स्पर्धक अर्चना गौतमच्या आवाजाने जवळ जवळ सगळ्यांच्या कानाचे पडदे दुखावले आहेत. अगदी प्रेक्षकांच्या सुद्धा. म्हणूनच एक युक्ती लढवत बिग बॉसने अर्चनाला टास्क दिला आहे. पण या टास्कचा गंभीर परिणाम तर शालीन भनोतवर होताना दिसतो आहे. सध्या व्हायरल प्रोमोमध्ये शालीन अर्चनाचा पोपट होऊन फिरतोय हे दिसत आहे. असं का..? तर जाणून घेऊया.
या प्रोमोमध्ये आपल्याला बिग बॉसचा आवाज ऐकू येतो. ज्यात ते बोलतात कि, घरातील स्पर्धकांनी एकेकाने सांगा कि कुणाचा आवाज तुम्हाला सगळ्यात जास्त त्रास देतो आणि त्या व्यक्तीच्या नावापुढे ‘शट अप’ लावून त्याचे नाव घ्या. यानंतर घरातील सगळेच स्पर्धक अर्चना गौतमाचे नाव घेत शट अप अर्चना बोलताना दिसतात. यामुळे अर्चनाला आता बिग बॉसच्या पुढील आदेशापर्यंत काहीही बोलता येणार नाहीये. हे ऐकून अर्चना बिग बॉसला हि शिक्षा फार मोठी आहे असे सांगताना दिसते आणि यावर बोस बॉसदेखील तिला शट अप अर्चना बोलतात.
यानंतर पुढे अर्चना आणि शालीन यांना कन्फेशन रूममध्ये बोलावले जाते आणि इथे बिग बॉस शालिनला अर्चनाचा आवाज हो असे सांगतात. ज्यामुळे पर्याय नसल्याकारणी शालिनला अर्चनाचा आवाज म्हणजेच अर्चनाचा पोपट होऊन फिरावे लागत आहे. आता अर्चनाचा आवाज किती वेळ बुलंद राहतो हे पाहण्यात भारीच मजा येणार आहे. तूर्तास हा प्रोमो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. बिग बॉसच्या या कल्पनेला प्रेक्षकही उदंड प्रतिसाद देताना दिसत आहेत.
Discussion about this post