हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही वर्षांपासून मराठी सिनेसृष्टीतील अनेक निर्माते तसेच दिग्दर्शक ऐतिहासिक कलाकृती बनविण्यावर विशेष भर देत असल्याचे दिसून आले आहे. महाराष्ट्राचे आद्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासाचे भव्य दिव्य आणि रुपेरी पडद्यावर सादरीकरण करताना यामध्ये शिवरायांची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्यावर त्या भूमिकेची मोठी जबाबदारी असते. तर शशिकांत पवार प्रोडक्शन अंतर्गत येणाऱ्या ‘रावरंभा’ या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता शंतनु मोघे हे पुन्हा एकदा शिवरायांची भूमिका साकारण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘रावरंभा’ या चित्रपटाची पटकथा आणि संवाद प्रताप गंगावणे यांचे असून हा चित्रपट ७ एप्रिल २०२३ रोजी प्रदर्शित होईल.
View this post on Instagram
अनुप जगदाळे दिग्दर्शित ऐतिहासिक चित्रपट ‘रावरंभा’ गेल्या अनेक महिन्यांपूर्वी चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली होती. पण या चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिका कोण साकारणार.? याविषयी कोणमतीही माहिती देण्यात आली नव्हती. याबाबत लोकांची उत्सुकता मोठी असताना आता अभिनेता शंतनू मोघे या चित्रपटामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत दिसणार अशी माहिती मिळत आहे. याआधी ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेमध्ये शंतनू यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. ज्यासाठी त्यांचे विशेष कौतुक झाले होते. तर आज शिवजयंतीच्या निमित्ताने ‘रावरंभा’तील शिवरायांचे पोस्टर प्रदर्शित झाले आणू या भूमिकेत शंतनू मोघे दिसणार आहेत हे समोर आले आहे.
याबाबत बोलताना अभिनेता शंतनू मोघे म्हणाले कि, ‘मी छोटया पडद्यावर ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेत साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेला प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं होतं. या भूमिकेचं गारुड आजही प्रेक्षकांच्या मनात असताना आता मोठ्या पडद्यावरही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळाल्याचा आनंद आहे. ‘रावरंभा’ हा अतिशय भव्यदिव्य व थक्क करणारा चित्रपट आहे. अभिनेता म्हणून मी स्वतःला खूप भाग्यशाली समजतो की, ‘रावरंभा’ चित्रपटात मला शिवाजी महाराजांची भूमिका साकारायला मिळतेय. ज्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाने आपला प्रेरणादायी इतिहास घडवला, समाजाला नवा विचार दिला, त्यामुळे अशी भूमिका साकारताना सोबत मोठी सामाजिक जबाबदारी नक्कीच असते.’
Discussion about this post