हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। फायनेस्ट अभिनेता अशी ओळख निर्माण केलेला अभिनेता शरद केळकर आता नव्या चित्रपटातीळ नव्या भूमिकेसाठी सज्ज झाला आहे. ‘तान्हाजी – द अनसंग वॉरियर’, ‘लक्ष्मी’ या चित्रपटांतून त्याने प्रेक्षकांवर चांगलीच छाप पाडली आहे. या चित्रपटानंतर त्याच्या अभिनयाचं कौतुक चौफेर झाले आहे. पण या दोनही चित्रपटांत तो सहाय्यक अभिनेत्याची भूमिका बजावत होता. मात्र आता तो मुख्य भूमिकेतून नव्या चित्रपटात दिसणार आहे. त्याच्या या आगामी चित्रपटाचे नाव आहे ‘देजा वू’. या चित्रपट अभिनेता शरद केळकर मुख्य भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे.
‘देजा वू’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अभिजीत वारंग करीत आहेत. शरदने स्वतः या चित्रपटाविषयी सांगितलं आहे. तर हा चित्रपट आपल्यासाठी विशेष असल्याचेही त्याने म्हटले आहे. हा पहिलाच असा चित्रपट असणार आहे, ज्यात एक पात्र एकाच ठिकाणी असणार आहे, तर बाकी सगळी पात्र ही वॉइस ओव्हर करणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेता दिग्दर्शक अभिजीत वारंग यांच्या चित्रपटात आपण काम करणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. त्यामुळे हा अतिशय वेगळ्या धाटणीचा चित्रपट असणार आहे. ‘पिकासो’ या चित्रपटासाठी अभिजीत वारंग यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.
शरदने तान्हाजी- द अनसंग वॉरियर या चित्रपटात शिवाजी महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर शरदच्या अभिनयाचे फारच कौतूक झाले होते. पुढे लक्ष्मी या चित्रपटातील तृतीयपंथीयाची भूमिका त्याने केली होती. शरदच्या या भूमिकेलाही प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळाला होता. याशिवाय त्याने लय भारी, हाऊसफूल ४, या चित्रपटांत देखील काम केले आहे. ‘देजा वू’ या चित्रपटात शरदची मुख्य भूमिका असून अभिनेत्री अमृता खानविलकर, अक्षय वाघमारे, किशोरी शहाणे, संजय मोने हे कलाकार देखील महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. तर पावनखिंड, भूज, जर्सी, आयलन या आगामी चित्रपटांत तो झळकणार आहे.
Discussion about this post