हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड जगतातील ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार उर्फ मोहमद युसूफ खान यांचे आज पहाटे निधन झाले. दरम्यान ते ९८ वर्षांचे होते. त्यांना गेल्या अनेक दिवसांपासून श्वासोच्छवासाचा त्रास होत होता. यामुळे त्यांना मुंबई खार येथील हिंदुजा रुग्णालयात त्यांवर उपचार चालू होते. दरम्यान त्यांची पत्नी सायरा बानू यांनी त्यांना हॉस्पिटलमधून घरी नेण्याची इच्छा व्यक्ती केल्यामुळे काही दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला होता. शक्य तितके सर्व शर्थीचे प्रयत्न करूनही दिलीप कुमार यांचा जीवनप्रवास अखेर आज थांबला आणि बॉलिवूडमधील एक पर्व कायमस्वरूपी संपले. त्यांच्या निधनामुळे बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे.
आपल्या अभिनय कौशल्याने सिनेसृष्टीत अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमारजी यांचे आज निधन झाले. याप्रसंगी आदरणीय @PawarSpeaks साहेब यांच्यासह त्यांच्या घरी जाऊन कुटुंबियांची भेट घेत सांत्वन केले व दिलीप कुमारजी यांना श्रद्धांजली अर्पण केली.#DilipKumar pic.twitter.com/V52XTRAhoc
— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) July 7, 2021
दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी ५ वाजता मुंबईतील सांताक्रुज जुहू कब्रिस्तान येथे दफन विधी होणार आहे. याआधी अंतिम दर्शन घेण्याकरिता अनेको दिग्गज आणि राजकीय मंडळी त्यांच्या घरी पोहोचली आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांनीदेखील दिलीप कुमार यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले आहे. शिवाय दिलीप कुमार यांच्या पत्नी सायरा बानो यांना धीर देत त्यांचे सांत्वन केले आहे. दिलीप कुमार यांच्या निधनाचे वृत्त समजताच शरद पवार यांनी ट्विटरवरून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती. या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले कि, ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल ऐकून दु:ख वाटले. आपण एक लेजेंड गमावला. शोकाकुल कुटुंब आणि चाहत्यांविषयी तीव्र संवेदना आणि सहानुभूती. या व्यतिरिक्त, राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच अन्य मंत्री आणि देशाचे पंतप्रधान यांनीही सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलीप कुमार याना श्रद्धांजली वाहिली आहे.
Saddened to hear about the demise of the veteran actor Dilip Kumar. We have lost a legend. Deep condolences to the grieving family and fans.
— Sharad Pawar (@PawarSpeaks) July 7, 2021
दिलीप कुमार यांना १९९४ सालामध्ये दादासाहेब फाळके या उच्च व मानांकित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तर १९९८ सालामध्ये दिलीप कुमार यांना पाकिस्तानने त्यांचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘निशान ए इप्तियाझ’ या पुरस्काराने गौरवले होते. याशिवाय त्यांना २०१५ सालामध्ये चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मविभूषण या सर्वोच्च नागरी सन्मानाने गौरवण्यात आले. यासह २००० ते २००६ या काळात ते राज्यसभेचे सदस्यदेखील होते. आज दिलीप कुमार आपल्यात भले नसतील मात्र त्यांच्या आठवणी आणि त्यांनी केलेले चित्रपटसृष्टीतील काम नेहमीच त्यांना आपल्यात जिवंत ठेवेल. दिलीप कुमार यांच्या निधनानंतर बॉलिवूडवर सध्या शोककळा पसरली आहे. अनेको कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
Discussion about this post