हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। काश्मीर पंडित यांच्या जीवनावर आधारित आणि वास्तवदर्शी कथानक असणारा ‘द कश्मीर फाईल्स’ आज ११ मार्च २०२२ रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाबाबत आधीच लोक अतिशय उत्सुक होते. यानंतर जेव्हा चित्रपटाचे स्क्रीनिंग झाले तेव्हा अनेक कलाकार मंडळी उपस्थित होते. चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येकाने माध्यमांमध्ये, सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात मराठी अभिनेता शरद पोंक्षे यांनीही आपली प्रतिक्रिया फेसबुक पोस्टमधून दिली आहे. शिवाय प्रत्येकाने हा चित्र पाहावे असे सांगत आपण भावनिक झाल्याचेही त्यांनी लिहिले आहे.
द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट कश्मीरी पंडिताच्या जीवनावर आधारित आहे. साल १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांनी केलेल्या स्थलांतरावर आणि काश्मीरमध्ये झालेल्या नरसंहाराचे हा चित्रपट भाष्य करतो. हा चित्रपट सत्य घटनांवर आधारित आहे. तर ‘द कश्मीर फाईल्स‘ या चित्रपट पाहिल्यानंतर शरद पोंक्षे यांनी एक फेसबुक पोस्ट लिहीली आहे. यात त्यांनी लिहिले आहे कि, प्रत्येकानं बघावा असा सिनेमा आहे, कारण लपवलेला हिंदूंचा इतिहास ज्या पध्दतीनं विवेक अग्निगोत्रींनी दाखवलाय.ते बघितलंच पाहिजे.अक्षरशः डोळे सतत पाणावतात. असं शरद पोंक्षे आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
या चित्रपटात ब्रह्मा दत्तच्या भूमिकेत मिथुन चक्रवर्ती, पुष्करनाथच्या भूमिकेत अनुपम खेर, कृष्णा पंडितच्या भूमिकेत दर्शन कुमार, राधिका मेननच्या भूमिकेत पल्लवी जोशी, श्रद्धा पंडितच्या भूमिकेत भाषा सुंबली, फारूक मलिक हे कलाकार एकत्र पडद्यावर पहायला मिळतेय. विवेक अग्निहोत्री यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. दरम्यान या चित्रपटाविषयी बोलताना अनुपम खेर यांनी म्हटले आहे कि, तुमच्या आशिर्वादामुळे मी आजपर्यंत अनेक सिनेमांमध्ये काम केलं आहे. अभिनय क्षेत्रात स्वत:चं नाव कमावू शकलो. पण ‘द कश्मीर फाईल्स’ या सिनेमात मी कुठलाही अभिनय नाही केला. तो जिवंत इतिहास आहे.
Discussion about this post