हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे सोशल मीडियावर सध्या चांगलेच चर्चेत आहेत. त्यांच्या अभिनयापेक्षा जास्त त्यांच्यातील निर्भीड मत प्रकट करण्याची खुमखुमी चाहत्यांमध्ये त्यांना चर्चेचा विषय बनवते. अनेकदा राजकीय, सामाजिक आणि इतर बऱ्याच विषयांवर ते रोखठोक मत मांडताना दिसतात. त्यांचे हिंदुत्ववादी विचार आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांवरील त्यांची निष्ठा आपण सारेच जाणतो. अनेकदा भाषणात ते सावरकरांचा आणि हिंदुत्वाचा उल्लेख करत असतात. अशाच त्यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ सध्या चांगलाच चर्चेत आलाय. ज्यामध्ये त्यांनी मुस्लिम ट्रेडमार्कविषयी परखड मत व्यक्त करत सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे.
या व्हायरल व्हिडिओमध्ये शरद पोंक्षे म्हणत आहेत कि, ‘गेली वीस- पंचवीस वर्षातलं सर्वात मोठं संकट आज आपल्या उंबऱ्याशी येऊन उभं आहे. ते म्हणजे ‘हलाल’.. आता हळूहळू ५६ मुस्लिम राष्ट्रांमध्ये तुम्हाला तुमचं प्रोडक्त्ट विकायचं असेल तर त्यावर ‘हलाल’चा स्टॅम्प असणं गरजेचं आहे. त्यांनी त्यांच्या देशात काय विकायचं आहे..? हा त्यांचा प्रश्न आहे. आपणही आपल्या देशात आपला ‘आयएसआय’ स्टॅम्प वापरतो. पण आता हे प्रकरण केवळ इस्लाम राष्ट्रात नाही तर जगभरात पसरू लागलं आहे. एवढंच नाही तर भारतातही काही दुकानांमध्ये ‘हलाल’ स्टॅम्प असलेल्या वस्तू विक्रीसाठी ठेवल्या जात आहेत.. जे अत्यंत धोक्याचं आहे’. असं म्हणत पोंक्षेंनी भारतीयांना येणाऱ्या संकटाचा इशारा दिला आहे.
भारतीय बाजारपेठेत ‘हलाल’ची सर्वाधिक चर्चा होत असते. अलीकडे ‘हलाल’बाबत विविध मते मांडली गेली. ‘हलाल’ हा एक इस्लामिक ट्रेड मार्क आहे. मुस्लिम समाजातील लोकांनी याच ट्रेडमार्कच्या वस्तू विकत घेण्यासाठी ‘हलाल’ची निर्मिती केली गेली ते. यातून मिळणारा सर्व पैसा हा इस्लाम राष्ट्रांना जातो आणि यावरूनच भारतात मोठा वाद निर्माण झाला होता. या ट्रेडमार्कवर टीकासुद्धा झाली. भारतासारख्या राष्ट्राला हा प्रकार अत्यंत धोकादायक असल्याचे अनेकांनी म्हटले. मात्र अजूनही भारतावरील हे संकट काही टळलेलं नाही. आजही ‘हलाल’चा स्टॅम्प असलेले अनेक प्रॉडक्ट बाजारात येत आहेत. म्हणून शरद पोंक्षे यांनी आपल्या भाषणातून पुन्हा एकदा ‘हलाल वर जहरी टीका करत भारतीयांना या संकटाचा इशारा दिला आहे.
Discussion about this post