हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच त्यांच्या अभिनयाइतके हिंदुत्ववादी विचारांमुळे चर्चेत राहिले आहेत. सोशल मीडियावर बरेच सक्रिय असल्यामुळे ते नेहमीच विविध व्याख्यानांमधून आपले विचार आणि राजकीय मते, तसेच इतर विषयांवर रोखठोक बोलताना दिसतात, अनेकदा यामुळे त्यांना ट्रोल केले जाते. मात्र ट्रोलिंगची भीती न बाळगता शरद पोंक्षे आपले धारदार शब्दांमधून व्यक्त होत असतात. यामुळे त्यांची अनेक विधाने चर्चेचा विषय ठरतात. पोंक्षेंनी अनेकदा जात पात बाजूला सारून हिंदूंनी एक यावे असे म्हटले आहे. मात्र आज याच मुद्द्यावरून त्यांचा संताप झाल्याचे चित्र दिसले आहे.
शरद पोंक्षे यांची व्याख्याने आणि चर्चासत्रे हि नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या माध्यमातून ते सावरकरांचे विचार जनमानसात पोहोचवतात आणि जाती संपवून एकत्र या असे आवाहनही करत असतात. बऱ्याचदा त्यांना त्यांच्या जातीवरून टीका सहन कराव्या लागतात आणि याहीवेळी असेच झाले. शरद पोंक्षे यांनी शिवराज्यभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा फोटो शेयर करत ‘छ.शिवाजी महाराजांना मानवंदना. असे राजे पुन्हा होणे नाही…’ अशी पोस्ट शेयर केली होती. यावर नेटकऱ्यांनी अत्यंत वाईट भाषेत प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील अनेकांनी पोंक्षेंची जात काढली अन त्यावर टीका केली आहे. हा जाती द्वेष पाहून अखेर शरद पोंक्षे संतापून कमेंट बॉक्समध्ये व्यक्त झाले.
या पोस्टवर शरद पोंक्षे यांना जातीवरून ट्रोल करणाऱ्या प्रत्येक ट्रोलरसाठी त्यांनी एक संतप्त कमेंट केली आहे. ज्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे कि, ‘कमाल वाटते.जातीद्वेश ईतका रूजलाय की माझ्या ह्या पोस्टवर पण जातीद्वेशातून प्रतिक्रिया आल्या. बुध्दीची कीव येते अशांची. जातीद्वेश त्यात ब्राह्मण द्वेश ईतका भरलाय किंवा तो जाणिवपुर्वक भरवला गेलाय की विरोध केल्याशिवाय स्वस्थ बसवतच नाही.करा जाती द्वेश ब्राह्मण द्वेश जेवढा करता येईल तेवढा करा.”० “ फरक पडतो .फक्त ईथे असं लिहीतील असं वाटलं नव्हतं म्हणून व्यक्त झालो बास. चलने दो…’
Discussion about this post