हॅलो बॉलिवूड ऑनलाईन | मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते शरद पोंक्षे हे थेट बोलण्यासाठी आणि भिडण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रोखठोक आणि परखड भूमिकेमुळे ते अनेकदा रोषाला बळी पडतात. पण यावेळी त्यांनी कहरच केला म्हणावं लागेल. कारण त्यांनी थेट समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या एका फोटोवरून अत्यंत संतापजनक असे भाष्य केले आहे. ज्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटण्याची दाट शक्यता आहे.
एका भर कार्यक्रमात बोलताना अभिनेता शरद पोंक्षे यांनी शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील नात उलगडून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, ‘एक लंगोट नेसलेला आणि दाढी वाढलेला सन्याशी खडकावर राजासारखा बसला आहे. तसेच बाजूला छत्रपती उभे आहेत. ते छत्रपती आहे. छत्रपतीपदावर बसलेले आहे. राज्याभिषेक झालेला आहे. स्वराज्याची निर्मिती झालेली आहे. राजा म्हणून राज्याभिषेक देशाने मान्य केलेला आहे. ते विनम्रपणे, शांतपणे बाजूला उभे आहे. जे खडकावर बसले आहे त्यांचे नाव आहे समर्थ रामदास स्वामी. उभा असलेल्या माणसाचे नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. दोघेही ग्रेट का..? खरा राजा तोच असतो ज्याला आपल्या देशातल्या, भूमीतल्या संतांना कसा आदर द्यायचा हे कळत.’
या वक्तव्यानंतर वातावरण गरम होताना दिसत आहे. इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटे यांनी शरद पोंक्षे यांचा समाचार घेत म्हंटले की, ‘ शरद पोंक्षे विकृती मांडण्याचा प्रयत्न करतात. पोंक्षे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास वाचावा व अभ्यास करावा. रामदास स्वामी आणि शिवाजी महाराजांची कधी भेट झाली नाही. रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू, मार्गदर्शक व शिक्षक नव्हते. पोंक्षे विकृती मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. यातून त्यांचा जातिवादी दृष्टिकोन, विषारी दृष्टिकोन दिसून येतो. त्यांच्यावर उपचार करण्याची गरज आहे. एकीकडे रामदास स्वामी यांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पादुकांजवळ उभे राहण्याची लायकी नव्हती म्हणतात. मात्र, दुसरीकडे रामदास स्वामी हे शिवाजी महाराजांचे गुरू असल्याचे ते सांगतात. शरद पोंक्षे यांना मेंटल हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करण्याची गरज आहे. आम्ही त्यांचा निषेध करतो.’
Discussion about this post