हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेविश्वातील सुप्रसिद्ध अभिनेते शरद पोंक्षे हे नेहमीच स्पष्ट, परखड आणि थेट बोलण्यासाठी ओळखले जातात. पोंक्षे म्हणजे जणू कडाडती तोफचं. त्यांच्यात जितका उत्तम अभिनेता आहे तितकाच उत्तम वक्ता देखील आहे. जो श्रोत्यांना विचार करायला भाग पाडू शकतो. अनेकदा ते आपल्या हिंदुत्ववादी विचारांनी श्रोत्यांना भारावून टाकतात आणि त्यामुळे ते नेहमीच कॅचर्चेत असतात. आताही त्यांचे हिंदू धर्मरक्षण विषयावरील व्याख्यान चर्चेत आहे. त्याचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे.
अभिनेते शरद पोंक्षे यांनी नुकतेच मुंबईतील विले पार्ले येथे हिंदू धर्मरक्षणावर व्याख्यान दिले. या व्याख्यानातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे कि, ‘लोकांच्या गरजा काय होत्या..? त्यांना काय हवं होतं..? या सगळ्याचा विचार करून एक प्रेषित, एक संस्था, एक नेतां एक महात्मा नेमला गेला आणि त्यांनी त्या अमुक एका संघटनेची स्थापना केली. म्हणून त्यांच्या धर्माचे संस्थापक आहे. एक महात्मा आहे. धर्म संस्थेच्या स्थापना एक तारीख एक तिथी आहे’.
पुढे म्हणाले कि, ‘जसं की या एका तारखेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली, शिवसेनेची स्थापना झाली, तसं इस्लाम धर्माची स्थापना झाली, ख्रिस्ती धर्माची स्थापना झाली. त्यामुळे त्या धर्म संस्था आहेत धर्म नाही. पण एकच असा धर्म आहे जो सृष्टीच्या निर्मिती पासून आहे तो म्हणजे माणुसकी.. आणि त्याचच नाव हिंदू धर्म आहे.. सगळ्यात प्राचीन, सर्वात सनातन असा एकमेव हिंदू धर्म’. शरद पोंक्षे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असताना नेटकरी त्यांच्या विचारांचे समर्थन करताना दिसत आहेत.
Discussion about this post