हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय चेहरा अभिनेता शशांक केतकर सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. यामुळे विविध लूक, विविध रिल्स आणि आगामी प्रोजेक्टसची माहिती तो या माध्यमातून आपल्या चाहत्यांना देत असतो. ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत श्री हे पात्र साकारून त्याने प्रेक्षकांच्या मनात स्वतःची एक जागा निर्माण केली आहे. यानंतर अध्या स्टार प्रवाहावरील ‘मुरंबा’ या मालिकेतून तो प्रेक्षकांवर जादू करतोय. अशातच आता त्याने सोशल मीडियावर शेअर केलेली एक पोस्ट प्रचंड चर्चेत आली आहे. हि पोस्ट आहे एक स्कॅमची.. घोटाळ्याची..
अनेकदा विविध पोस्ट शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या शशांकने नुकतीच एक पोस्ट शेअर करत पुन्हा एकदा सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. जी पोस्ट पाहून सगळ्यांनाच शशांक कुठल्या घोटाळ्यात अडकणार आहे..? अशी चर्चा सुरू झाली आहे. कारण ही पोस्टचं मुळात एका घोटाळ्याची आहे. ‘SCAM 2003’चा क्लॅप हातात घेऊन शशांकने हा फोटो क्लिक केला आहे. या क्लॅपवर हन्सल मेहता यांचेही नाव आहे. आता या क्लॅपवरून तुमच्या लक्षात आले असेलच कि शशांकच्या रिअल लाईफमध्ये तो कोणत्याही स्कॅममध्ये अडकणार नसून रिल लाईफमध्ये मात्र अडकण्याची शक्यता आहे. हा फोटो शेअर करत त्याने कॅप्शमध्ये लिहिले आहे, ‘ २०२२ वर्ष हे मस्तच गेलं आणि २०२३ हे नवीन वर्षही छान असेल.’
एका वेब सिरिजच्या स्वरूपात हा घोटाळा आपल्या समोर येत असून यामध्ये शशांक महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. म्हणूनच शशांकने हि पोस्ट शेयर करत आपल्या चाहत्यांना आगामी प्रोजेक्टचे संकेत दिले आहेत. ‘स्कॅम १९२२’ या २०२० साली आलेल्या वेबसिरीजने ओटीटीवर अक्षरशः धुमाकूळ घातला. प्रसिद्ध दिग्दर्शक हन्सल मेहता यांच्या स्कॅम १९२२ मध्ये प्रतिक गांधी मुख्य भूमिकेत होता. यानंतर आता हन्सल मेहता आणखी एका घोटाळ्यावर सिरीज घेऊन येत आहेत आणि यामध्ये मराठी अभिनेता शशांक केतकर महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. त्यामुळे त्याचे चाहते उत्सुक झाले आहेत. माहितीनुसार, तेलगी घोटाळ्याची संपूर्ण कहाणी हन्सल मेहता आपल्या या सिरीजमधून दाखवणार आहेत.
Discussion about this post