Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

टीव्ही जगतातील ‘या’ लोकप्रिय दांपत्याने दिली गुड न्यूज; लग्नाच्या तब्बल 18 वर्षानंतर झाले आई- बाबा

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
December 3, 2022
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, रिलेशनशिप, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shilpa_Apurva
0
SHARES
152
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड इंडस्ट्रीतील अनेक दाम्पत्यांना अपत्य झाल्याचे आपण पाहिले. यामध्ये सोनम कपूर- आनंद अहुजा, आलिया भट्ट- रणबीर कपूर, बिपाशा बसु- करणसिंग ग्रोव्हर या जोडप्यांचा समावेश आहे. या अभिनेत्रींच्या प्रेग्नेंसीपासून ते बाळाच्या नामकरणापर्यंत सोशल मीडियावर कायम चर्चा राहिली. अशाप्रकारे टीव्ही जगातील दोन प्रसिद्ध कलाकारांच्या आयुष्यात देखील आई आणि बाबा होण्याचा आनंद आला आहे. अभिनेता अपूर्व अग्निहोत्री आणि अभिनेत्री शिल्पा सकलानीने ही गोड बातमी सोशल मिडीयावर दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Apurva Agnihotri (@apurvaagnihotri02)

अपूर्व आणि शिल्पा हे दोन्ही कलाकार मालिका विश्वातील अत्यंत लोकप्रिय चेहरे आहेत. त्यांची केमिस्ट्री नेहमीच प्रेक्षकांना भावली आहे. लग्नाच्या तब्बल १८ वर्षांनंतर शिल्पा अपूर्व पहिल्यांदाच पालक झाले आहेत. अभिनेता अपूर्व अग्निहोत्रीने आपण एका लहान गोड मुलीचे बाबा झाल्याची आनंदाची बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांना दिली आहे. हि एक व्हिडीओ पोस्ट आहे. ज्यामध्ये शिल्पा- अपूर्व हे जोडपे आपल्या लहान चिमुकल्या बाळाला मांडीत धरून तिच्याकडे प्रेमाने पाहत आहे. गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये त्यांची लेक अतिशय गोड दिसतेय. या व्हिडीओवर चाहते त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत आणि परीचं स्वागत करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Apurva Agnihotri (@apurvaagnihotri02)

या व्हिडीओमध्ये अपूर्वने विविध फोटो शेअर केले आहेत. या व्हिडिओसोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहले आहे कि, ‘म्हणूनच माझा वाढदिवस माझ्या आयुष्यातील सर्वात खास वाढदिवस बनला.. कारण देवाने आम्हाला आतापर्यंतची सर्वात खास, अविश्वसनीय, आश्चर्यकारक, चमत्कारी भेट दिली आहे. मी आणि शिल्पा आनंदाने आमची लाडकी मुलगी ईशानी कानू अग्निहोत्रीची ओळख करून देऊ इच्छितो. कृपया तिला आशीर्वाद द्या.’ शिल्पा आणि अपूर्वने २००४ साली लग्नगाठ बांधली आहे. अपूर्वने आतापर्यंत मालिका, रिऍलिटी शो तसेच चित्रपटांमध्येही काम केले आहे. ‘परदेस’सारख्या चित्रपटांमधून तर ‘जस्सी जैसी कोई नहीं’सारख्या टीव्ही मालिकांमधून तो लोकप्रिय ठरला आहे. तसेच शिल्पाने कुसुम’, ‘जस्सी जैसी कोई नहीं’, ‘नच बलिए १’, ‘बिग बॉस ७’ यांसारख्या शोमधून स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

Tags: Apurva AgnihotriBlessed With Baby GirlInstagram PostTV Actorviral postViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group