Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

तळ्यात, मळ्यात रोहित शेट्टीच्या कृपेने शिल्पाचा पाय गळ्यात; शुटिंग सेटवर झाला अपघात

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
August 10, 2022
in फोटो गॅलरी, वेबसिरीज, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shilpa_RohitShetty
0
SHARES
35
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। जर तुम्ही बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे चाहते असाल तर हि बातमी वाचून नक्कीच तुम्हाला वाईट वाटेल. माहितीनुसार, अभिनेत्री शिल्पा शेट्टी प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या कॉप्स वेबसिरीजमध्ये दिसणार आहे. या सीरिजचे शूट करत असताना तिला एक अपघात झाला आणि तिला सेटवरच दुखापत झाली. हि दुखापत इतकी गंभीर होती कि तिच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर घालावे लागले आहे. याबाबत स्वतः अभिनेत्री शिल्पा शेट्टीने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना माहिती दिली आहे. हि पोस्ट पाहून अनेक चाहते ती लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

अभिनेत्री शिल्पा शेट्टीने शेअर केलेल्या पोस्टमध्ये तिने फ्रॅक्चर पाय दिसेल असा फोटो शेअर केला आहे. दुखापत असूनही ती कुल अंदाजात दिसते आहे. या फोटोसह तिने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘रोल… कॅमेरा… अॅक्शन – “ब्रेक अ लेग!” मी ते शाब्दिक स्वरूपातले स्वीकारले आहे. आता ६ आठवडे अॅक्शनच्या बाहेर.. पण मी लवकरच पुन्हा मजबूत आणि चांगली होईन परत येईन. तोपर्यंत प्रार्थनेत मला लक्षात ठेवा. कारण प्रार्थना नेहमी काम करते. कृतज्ञतापूर्वक, शिल्पा शेट्टी कुंद्रा.’

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

या फोटोमध्ये शिल्पाच्या पायातील फ्रॅक्चर पाहून तिला झालेल्या दुखापतीचा चांगलाच अंदाज येतो आहे. पण फोटोची खासियत म्हणजे वेदना असूनही शिल्पाच्या चेहऱ्यावर एक रेषही नाही. उलट तिच्या चेहऱ्यावरील हास्य चाहत्यांना धैर्य देत आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

वर्कफ्रन्टबद्दल बोलायचं तर, बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूडचा ऍक्शन किंग दिग्दर्शक रोहित शेट्टीसोबत ‘इंडियन पुलिस फोर्स’ या वेबसीरिजमध्ये काम करतेय. आता दुखापतीमुळे ती सुमन आठवडाभर शूट करू शकणार नाही. तिला डॉक्टरांनी घरीच पूर्ण आराम करण्याची ताकीद दिली आहे.

View this post on Instagram

A post shared by Shilpa Shetty Kundra (@theshilpashetty)

पण मी लवकरच येईन असे सांगत शिल्पाने कामाप्रती उत्साह दाखवला आहे. हि ८ एपिसोड्सची वेबसिरीज अमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर लवकरच प्रदर्शित होईल अशी आशा आहे.

Tags: Action on Shooting SetAmazon Prime VideofractureIndian Police Forcerohit shettyShilpa Shetty- KundraViral Photo
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group