हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी नेहमीच तिच्या फिटनेस आणि वैयक्तिक गोष्टींमुळे चर्चेत असते. याहीवेळी ती सोशल मीडियावर चर्चेत आहे. ज्याचं कारण ठरलंय होळी. संपूर्ण राज्यभरात रीती रिवाजानुसार होळीचे पूजन, दहन आणि दुसऱ्या दिवशी धुळवड साजरी केली गेली.
शिल्पा शेट्टीने देखील तिच्या कुटुंबियांसह आणि मुलांसह होळीचा आनंद लुटला. मात्र होळी दहनावेळी तिने केलेली चूक हि नेटकऱ्यांच्या लक्षात येताच मोठा बवाल झाला. नेटकऱ्यांनी शिल्पाला धार्मिक परंपरेत चुकीच्या विधी केल्याबद्दल चांगलेच झापले आहे.
बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीने तिच्या अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर होळी दहन करतानाच एक व्हिडीओ शेअर केला आहे. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हाच तिच्या ट्रोलिंगचं कारण ठरला आहे. या व्हिडीओवर शिल्पाचे चाहते देखील नाराज झाले आहेत. या व्हिडिओत शिल्पासोबत तिचा पती राज कुंद्रा, मुलगा विवान, मुलगी समिशा आणि शिल्पाची आई दिसतेय. यात तिने घरातून नकारात्मक ऊर्जा बाहेर जाऊन सकारात्मकतेचा प्रकाश घरात यावा म्हणून होळी दहन केले आहे. पण यावेळी तिने पायात चप्पल घालून पूजा केली आहे. तसेच होळीसाठी बांबूचा वापर केला आहे. जे हिंदू धर्मात अमान्य आहे.
त्यामुळे नेटकऱ्यांनी शिल्पाला तिची चूक दाखवत खडसावले आहे. या व्हिडिओवर कमेंट करताना एकाने लिहिले आहे कि, ‘हिंदू धर्मात बांबू जाळण्यास मनाई आहे’. तर आणखी एकानं लिहिलं आहे,’आधी आपले चप्पल बाजूला काढून ये.. पूजा करताना चप्पल घालत नाहीत इतकी पण अक्कल नाहीये का…?’ तर आणखी एकाने म्हटले कि, ‘सणाच्या नावावर धार्मिक परंपरा बदलशील काय..? चर्चेत यायला काहीही करशील..?’ तसेच आणखी एकाने म्हटले आहे कि, ‘दिखाव्यासाठी व्हिडीओ बनवणं सोड आणि आधी परंपरा समजून घे’
Discussion about this post