हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। आजकाल माणुसकी हा शब्द फक्त ऐकायला चांगला वाटतो कारण प्रत्यक्षात त्याचा अनुभव फार कमी लोकांना येत आहे. पण लहान मुलांमध्ये माणुसकी आणि माणूस दोन्ही जिवंत आहे हे सतत पाहायला मिळतंय. सोशल मीडियामुळे जगभरातील कित्येक व्हिडीओ व्हायरल होत असतात. यामध्ये सेलिब्रिटींच्या मुलांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी गेल्या २ वर्षांपासून विविध कारणांमुळे चर्चेत आली. ती सोशल मीडियावर सर्वात सक्रिय असणारी अभिनेत्री आहे. खरतर २०२१ हे वर्ष तिच्या संपूर्ण कुटुंबासाठी कठीण होते. पण यातून ती आता बाहेर आली आहे. तिच्या लहान मुलीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यात तिची चिमुकली लेक गायत्री मंत्राचे आवर्तन करतेय. याचे कारण जाणून घ्याल तर तुम्हीही क्या बात है म्हटल्याशिवाय राहणार नाही.
खरतर मागील २ वर्षांपासून शिल्पा आणि तिचे कुटुंब फार वेगळ्या मनस्थिती आणि परिस्थितीतून जात होते. पण हे नवीन वर्ष शिल्पासाठी खूप खास ठरत आहे. याचे कारण म्हणजे नवीन वर्ष २०२२ सुरु झाले असून या फेब्रुवारीमध्ये तिच्या मुलीचा अर्थात समिशाचा वाढदिवस येत आहे. यावर्षी समिशा २ वर्षाची होतेय. समिशा या घरातील सगळ्यात लहान आणि गोड व्यक्तिमत्व आहे. मनाने निर्मळ आणि स्वच्छ अंतःकरण असणारी हि चिमुकली सध्या सर्वांच्या मनाचा ठाव घेतेय. याचे कारण म्हणजे शिल्पा अनेकदा समिशाचे व्हिडिओ, फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. पण यावेळी तिने शेअर केलेला व्हिडीओ थोडा वेगळा आहे.
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता कि, शिल्पाच्या घराच्या गार्डनमध्ये एक पक्षी जखमी अवस्थेत बसला आहे. त्याला बघून शिल्पाची लेक समिशा विचारात पडते. त्यानंतर जे काही घडले ते अनोखे आणि अद्भुत होते. त्याचाच हा व्हिडिओ आहे. शिल्पा आणि समिशा व्हिडिओमध्ये त्यांच्या गार्डनमध्ये फिरताना दिसत असतात. तेवढ्यात समिशाला गार्डनमध्ये शांत बसलेला एक पक्षी दिसतो. कदाचित तो जखमी झाल्यामुळे त्याला उडता येत नसावे असे शिल्पा तिला सांगते. यानंतर शिल्पा समिशाला तो पक्षी बरा होण्यासाठी प्रार्थना करायला सांगते आणि यानंतर समिशा चक्क गायत्रीमंत्र म्हणताना दिसते. समिशा तिच्या गोड बोबड्या आवाजात गायत्रीमंत्र म्हणण्याचा प्रयत्न करते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि लोक तिच्या भाबडेपणाचे कौतुक करताना दिसत आहेत.
Discussion about this post