Hello Bollywood
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives
Hello Bollywood
No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

सत्या मांजरेकरच्या ‘सुका सुखी’ हॉटेलला शिव ठाकरेची भेट; Insta’स्टोरी शेअर करत म्हणाला,

Vishakha Mahadik by Vishakha Mahadik
April 28, 2023
in Hot News, Trending, फोटो गॅलरी, बातम्या, व्हिडिओ, सेलेब्रिटी
Shiv Thakare
0
SHARES
135
VIEWS
WhatsAppFacebookTwitter

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या मांजेरकर याने हॉटेल इंडस्ट्रीत पदार्पण केले आहे. ‘वीर दौडले सात’ या चित्रपटात सत्या अत्यंत महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार होता. मात्र अचानक तो अभिनय क्षेत्रातून युटर्न घेत डायरेक्ट हॉटेल इंडस्ट्रीत उतरला. यामुळे त्याच्या नव्या हॉटेलची चर्चा एकदम जोरदार सुरु आहे. अनेक सेलिब्रिटी मंडळी त्याच्या हॉटेलमधील चमचमीत जेवणाचा आस्वाद घेत असतात. नुकताच शिव ठाकरे देखील सत्याच्या हॉटेलमध्ये गेला होता. यानंतर त्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत याची माहिती दिली.

View this post on Instagram

A post shared by Satya Manjrekar (@satyamanjrekar)

काही दिवसांपूर्वीच महेश मांजरेकर यांचा लेक सत्या मांजरेकरने ‘सुका सुखी’ नावाचं स्वतःच हॉटेल सुरु केलं आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरात हे हॉटेल आहे. सत्याच्या हॉटेल मेन्युमध्ये सुक्या मच्छीचे चमचमीत प्रकार हे खास आकर्षण आहेत. अगदी चार दिवसांपूर्वीच अभिनेत्री नीना कुलकर्णी यांनी सत्याच्या हॉटेलमधून चमचमीत जेवण ऑर्डर केलं होतं आणि त्यानंतर आता शिव ठाकरेनेही त्याच्या हॉटेलला भेट दिली आहे. यानंतर अधिकृत सोशल मीडिया हॅण्डल इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत शिवने सत्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

या इंस्टास्टोरीमध्ये शिवने सत्यासोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो ‘सुका सुखी’ हॉटेलबाहेर क्लिक केलेला आहे. या फोटोसोबत शिवणे कॅप्शनमध्ये लिहिले आहे कि, ‘नवीन सुरुवातीला शुभेच्छा सत्या मांजरेकर’. माहितीनुसार, बिग बॉस मराठी सीजन २ चा विजेता आणि बिग बॉस हिंदी सीजन १६ चा उपविजेता शिव ठाकरे हा लवकरच ‘खतरों के खिलाडी’ या रिअॅलिटी शोच्या आगामी पर्वात विविध खतरनाक स्टंट करताना दिसणार आहे. यापूर्वी त्याने मुंबईत सिद्धीविनायकाचे दर्शन घेतले आणि बाप्पाचा आशीर्वाद घेतल्यानंतर तो सत्या मांजरेकरच्या हॉटेलमध्ये गेला होता.

Tags: hotelInsta StoryInstagram Postmarathi actorSatya ManjrekarShiv ThakareViral Video
SendShareTweet

Discussion about this post

Hello Bollywood

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

  • Contact us
  • Privacy Policy

No Result
View All Result
  • बातम्या
  • सेलेब्रिटी
  • हिंदी चित्रपट
  • मराठी चित्रपट
  • वेबसिरीज
  • फिल्म रिव्हिव्ह
  • गरम मसाला
  • रिलेशनशिप
  • लाईफस्टाईल
  • ब्लॉग
  • फोटो गॅलरी
  • व्हिडिओ
  • Story Archives

© 2022 Hello Bollywood. All Rights Reserved.

Join WhatsApp Group